नामकोवर प्रगती पॅनलचा झेंडा,सहकारी पॅनलचा धुव्वा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

नाशिकः नाशिक मर्चंट्‌स को.ऑपरेटीव्ह बॅंकेवर अखेर प्रगती पॅनेलचा झेंडा फडकला असुन सभासदांनी यंदा 21 पैकी 21 जागांवर प्रगती पॅनलचे उमेदवार विजयी करुन त्यांचे एक हाती सत्तेचे स्वप्न साकार केले आहे.सहकार पॅनलने चुरशीची लढत देण्याचा आटोकाट प्रयत्न केला असला तरी एक ते दिड हजाराची आघाडी ते तोडु शकले नाही. त्यामुळे सहकार पॅनलचे नेते गजानन शेलार यांनाही यंदा पराभव पत्करावा लागला. बॅंकेचे माजी अध्यक्ष स्व. हुकुमचंद बागमार यांचे पुत्र अजीत बागमार यांच्या नम्रता पॅनलचा तर पार धुव्वा उडाला. 

  काल पासुन आज दुपारी चार पर्यंत तब्बल25तास बॅंकेची मतमोजनी सुरु होती. सुरवाती पासुनच प्रगती पॅनलने आघाडी घेतली व ती शेवट पर्यंत टिकवली. त्यात नम्रता पॅनलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी,वसंतराव गिते( 32468), सोहनलाल भंडारी,(29054) विजय साने( 26573), हेमंत धात्रक ( 29152) ,महेंद्र बुरड( 29697) भानुदास चौधरी (24552), शिवदास डागा( 28159), प्रकाश दायमा( 28865) , संतोष धाडीवाल( 25311), गणेश गिते( 26689),अविनाश गोठी( 27024), कांतीलाल जैन( 26930),हरीश लोढा( 26805), सुभाष नहार(27013),नरेंद्र पवार( 26432), प्रफुल्ल संचेती( 26568),अशोक सोनजे(24983), रंजन ठाकरे(26890), शोभा छाजेड(34808), रजनी जातेगावकर(30815), प्रशांत दिवे( 31172) हे विजयी झाले. 
 
Web Title: marathi news namco