नंदूरबार ग्रामीण भागाची जीवनवाहिनी लालपरी झाली पुर्ववत 

धनराज माळी
Monday, 12 October 2020

कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून ग्रामिण भागातील लालपरी अर्थात एस.टी. सेवा बंद आहे. मात्र आता परिस्थिती पूर्व पदावर येत असून लांब पल्ल्याप्रमाणे ग्रामिण भागातील बसेस नियमितपणे सुरू करण्यात यावी,

नंदुरबार: जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागात बससेवा बंद असल्यामुळे असंख्य प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होण्या संदर्भात नदुरबार तालुका ग्राहक पंचायत मार्फत राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक मनिषा सपकाळ यांना निवेदनाव्दारे ग्रामीण भागात लालपरी सेवा सुरू करण्याचे साकडे घालण्यात आले होते. यानिवेदनाची तत्काळ दखल घेत नंदुरबार जिल्ह्यातील तालुका निहाय ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत सुरू करण्या संदर्भात निर्देश देण्यात आले आहे.परिणामी तालुक्यातील खोलघर, नाशिंदा, तलाडे, हरणीपाडा या ग्रामीण भागातील बससेवेला पहिल्या टप्प्यात एसटी वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे. दुसर्‍या टप्पयात लवकरच इतरही ग्रामीण भागातील बससेवा सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. 

आवश्य वाचा- नंदूरबारची ग्रामदैवत खोडाई मातेची यात्रा रद्द  ! 
 

लांबपल्यांचा बससेवा प्रमाणेच आता ग्रामीण भागातील प्रवाशांना लालपरीची सेवा उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न नंदुरबार तालुका ग्राहक पंचायतने मांडल्याबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. या संदर्भात नंदुरबार तालुका ग्र्राहक पंचायतीमार्फत दिलेल्या निवेदनाची तत्काळ दखल घेण्यात आली. जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागात बससेवा बंद असल्यामुळे असंख्य प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होण्या संदर्भात ग्रामीण भागात लालपरी सेवा सुरू करण्याचे साकडे घालण्यात आले होते. यानिवेदनाची तत्काळ दखल घेत नंदुरबार जिल्ह्यातील तालुका निहाय ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत सुरू करण्या संदर्भात निर्देश देण्यात आले आहे.

लांबपल्यांचा बससेवा प्रमाणेच आता ग्रामीण भागातील प्रवाशांना लालपरीची सेवा उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न नंदुरबार तालुका ग्राहक पंचायतने मांडल्याबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून ग्रामिण भागातील लालपरी अर्थात एस.टी. सेवा बंद आहे. मात्र आता परिस्थिती पूर्व पदावर येत असून लांब पल्ल्याप्रमाणे ग्रामिण भागातील बसेस नियमितपणे सुरू करण्यात यावी, अशी मागणी नंदूरबार तालुका ग्राहक पंचायत आणि प्रवासी महासंघातर्फे अध्यक्ष, महादू हिरणवाळे यांनी केली होती.

वाचा- नंदुरबार जिल्ह्यातील चोवीस हजारांवर शेतकऱ्यांचा डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी
 

ग्रामिण भागात लालपरी बंद असल्याने ग्रामिण भागातील जनतेची गैरसोय होत आहे. दररोज शहरी भागात वैद्यकिय, बाजारहाट व इतर कारणांसाठी यावे लागते. लवकरच शासनाने शाळा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय ग्रामिण भागातील असंख्य नागरीक रोजगारासाठी शहरात येतात. म्हणून तातडीने ग्रामिण बससेवा सुरु करण्यात याव्या तसेच नंदुरबार बसस्थानकावरून जिल्हा रूग्णालय, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषद, आर.टी.ओ. कार्यालयापर्यंत मिनी बस सुरू करण्याबाबत ग्राहक पंचायतीने यापूर्वीच निवेदन दिले आहे. याबाबत फेर्‍यांचे नियोजन करण्याची मागणी नंदुरबार तालुका ग्राहक पंचायत त्तर्फे केली होती. लांब पल्लयांच्या बसेस प्रमाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बससेवा सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. लवकरच शाळा देखील सुरू होणार असल्याचे संकेत राज्य शानामार्फत देण्यात आल्याने विद्यार्थ्यासाठी एसटीचा प्रवास हा मोलाचा ठरणार आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nanadurbar rural st bus service will be restored