esakal | नंदूरबारची ग्रामदैवत खोडाई मातेची यात्रा रद्द  !
sakal

बोलून बातमी शोधा

नंदूरबारची ग्रामदैवत खोडाई मातेची यात्रा रद्द  !

नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी शहराची ग्रामदैवत खोडाई माता मंदिर परिसरात मोठी यात्रा भरवण्यात येते. परंतु, यंदा यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रा रद्द करण्यात आल्यामुळे लहान मोठ्या व्यावसायिकांवर मोठा आर्थिक फटका बसला आहे.

नंदूरबारची ग्रामदैवत खोडाई मातेची यात्रा रद्द  !

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार :  गणेशोत्सवानंतर अवघ्या तरुणाईला वेड लागते ते नऊ दिवसांच्या नवरात्रीचे. नवरात्र उत्सव म्हटला म्हणजे जल्लोष. रास,दांडिया गरबा खेळण्याची धूम.परंतु, यंदा सर्वच सर्व सण-उत्सवांवर पाणी फिरववावे लागत आहे. वर्षानुवर्षांची परंपरा असलेली शहरातील खोडाई देवी यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मंदिरमध्ये ही देवीचे दर्शन नियमांचे पालन करूनच घेता येणार असल्याने भक्तांचा हिरमोड झालाय.

आवर्जून वाचा- नंदुरबार जिल्ह्यातील चोवीस हजारांवर शेतकऱ्यांचा डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी 
 

मार्च महिन्यापासून कोरोना साथरोग महामारीमुळे शासन आदेशान्वये धार्मिक,सांस्कृतिक तसेच अन्य सर्वच कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. आठवड्यावर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवावर कोरोनाची झालर आहे. तरुणाईला वेड लावणाऱ्या रास, दांडिया, गरबा यंदा होणार नसल्याने युवा वर्गाचा प्रचंड नाराजी पसरली आहे.

उत्सव काळात भाविकांची गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय शासन स्तरावरून घेण्यात आलेला आहे. गृह विभागाकडून देखील मार्गदर्शक सूचना परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.

नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी शहराची ग्रामदैवत खोडाई माता मंदिर परिसरात मोठी यात्रा भरवण्यात येते. परंतु, यंदा यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रा रद्द करण्यात आल्यामुळे लहान मोठ्या व्यावसायिकांवर मोठा आर्थिक फटका बसला आहे. शहरातील अनेक नागरिकांना यात्रेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत होता.

देवी मंदिराची रंगरंगोटी

शहराची ग्रामदैवत खोडाई माता मंदिराची साफसफाई करण्यात येत आहे. दोन दिवसांपासून मंदिराचे व्यवस्थापक वसंत गोहिल, पुजारी अण्णा ठाकरे, विष्णू ठाकरे यांच्या देखरेखखाली रंगरंगोटीचे काम करण्यात येत आहे.

वाचा- धुळ्यातील‘अमृत' मधील उद्यानांची अवस्था; ‘हरित' नव्हे‘चराई‘क्षेत्र विकास ! 
 

भाविकांनी सहकार्य करावे

गुजरात,महाराष्ट्र व मध्य प्रदेशातून नवरात्र उत्सव निमित्त खोडाई मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात.परंतु, यंदा कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने घेतला आहे. गृह विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात नुसार मंदिरात पूजा विधि करण्यात येणार आहे. भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन व्यवस्थापक वसंत गोहिल, पुजारी अण्णा ठाकरे, विष्णू ठाकरे यांनी केले आहे 
 

संपादन-भूषण श्रीखंडे