
माध्यमिक शालांत परीक्षेचे ३००० नियामक/परिक्षक यांचे १ कोटी रक्कम आज जमा केली असून उर्वरित ५५०० परिक्षक/नियामक यांचे मानधन या आठवड्यात अदा करण्यात येईल
नंदुरबार ः माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०२० चे परिक्षक/नियामक यांच्या मेहनताना मिळावा म्हणून नाशिक विभागीय परीक्षा मंडळाचे अध्यक्ष के.बी.पाटील यांना निवेदन देऊन संबंधित अधिकार्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली.
आवश्य वाचा- पन्नाशीपार पुंडलिक भामरे यांची तरुणाईला लाजविणारी ऊर्जा
नाशिक विभागीय परीक्षा मंडळ अंतर्गत माध्यमिक शालांत परीक्षेचे जवळपास ८५०० व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेचे ७००० परिक्षक/नियामक यांचा मेहनताना कोवीड १९ सारख्या महामारीच्या परिस्थितीमुळे प्रलंबित होते. नाशिक विभागीय परीक्षा मंडळाचे अध्यक्ष के.बी.पाटील यांनी याबाबत आपल्या विभागीय मंडळातील पदाधिकार्यांशी चर्चा करून उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचे सर्व परिक्षक/नियामक यांचे मेहनतानाचे चेक जमा करण्यात आले. फक्त १८० परिक्षक/नियामक यांचे बँकेच्या आयएफएससी/खाता नंबरच्या तांत्रिक कारणास्तव प्रलंबित आहेत. तर माध्यमिक शालांत परीक्षेचे ३००० नियामक/परिक्षक यांचे १ कोटी रक्कम आज जमा केली असून उर्वरित ५५०० परिक्षक/नियामक यांचे मानधन या आठवड्यात अदा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
त्वरित झालेल्या कार्यवाही बद्दल मंडळ पदाधिकार्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच विभागातील ६०० शाळांनी नोंदणी शुल्क अदा केलेले नाही. शिक्षण संक्रमण अंकाची वर्गणी भरलेली नाही, त्यांनी त्वरित भरणा करावा अशी अपेक्षा के.बी.पाटील, नितीन उपासनी यांनी व्यक्त केली.
वाचा- धुळे जिल्ह्यात विनामास्क वाहतूक सुसाट
विभागातील शिक्षण विभागातील सर्व संघटनांच्यावतीने आवाहन करण्यात येते आहे की, ज्या शाळांनी अद्यापपावेतो नोंदणी शुल्क व शिक्षण संक्रमण अंकाची वर्गणी भरलेली नसेल त्यांनी फी भरणा त्वरित करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. सदर चर्चेत डी.के.आंधळे, टी.डी.एफ.चे राज्य सहकार्यवाह डॉ.एन.डी.नांद्रे, नंदुरबार जिल्हा माध्य शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रभाकर नांद्रे उपस्थित होते.
संपादन- भूषण श्रीखंडे