न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहत वकिलांनी केले निर्दशन 

संजीव निकम
गुरुवार, 25 जानेवारी 2018

नांदगाव : राज्य सरकारने कोर्टाच्या फी मध्ये सरासरी तीन ते टक्के वाढ केल्याने त्याची झळ सामान्य अशिलांना पोहचणार असल्याने त्याच्या निषधेधार्थ आज येथील वकील संघाने न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहत न्यायालयाच्या इमारतीबाहेर धरणे आंदोलन केले. 

नांदगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅड. व्ही. पी. आहेर यांच्यासह अॅड. गुलाबराव पालवे, अॅड अनिल शिंदे, अॅड बी. आर. चौधरी, अॅड. गजानन सुरसे, अॅड राजेंद्र दराडे, अॅड एस जे घुगे, अॅड पी एम घुगे, अॅड एफ सी सोनवणे, अॅड सचिन साळवे, अॅड हिरालाल गांधी, अॅड सुमंत पाटील, अॅड महेश पाटील, अॅड बी बी बिन्नर, अॅड दिगंबर आहेर, अॅड किरण गायकवाड, अॅड पी एम पवार आदी वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. या संदर्भातील पत्र नांदगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅड. व्हि. पी. आहेर यांनी प्रसिद्धीस दिले आहे. 

निवेदनात, दिवाणी दाव्याच्या फीची कमाल मर्यादा 3 लाख रु. होती ती वाढवून 10 लाख रु. केलेली आहे. मुदतीच्या अर्जाची फी 10 रु. वरून 50 रु. करण्यात आलेली आहे. याशिवाय मृत्युपत्र, वारसा दाखला यासारख्या विषयांच्या फीमध्ये चार ते पाच पट वाढ करण्यात आली आहे. वाढीव फीमुळे न्यायिक व्यवस्थेपासून लोक दुर जातील व गोरगरीब जनतेस न्याय मिळणे अशक्य होईल असे नमूद करण्यात आले आहे. नांदगाव वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य यांनी निषेधाचे फलक हाती घेतले होते. 

Web Title: Marathi news nandgao news advocates