नांदगावची जागा काँग्रेसला सोडा- अँड अनिल आहेर 

संजीव निकम
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

नांदगाव- निवडणुकीसाठी असलेले  भविष्यातीलउमेदवारांनी नांदगावला रणभूमीचे स्वरूप आणून टाकले आहे कुणाच्या मागे पोलिसांचा तर कुणाच्या मागे ईडीचा ससेमिरा एक नाशिकचा तर दुसरा मुबंईचा यांनी निवडणुकीसाठी यायचे,पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकायच्या.व तालुक्यातल्या जनतेच्या  जीवावर मजा मारायची या बाहेरची मंडळीनी तालुक्याची दुर्दशा केली अशा शब्दात काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी आमदार अँड अनिल आहेर यांनी पक्ष निरीक्षकांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या
 
नांदगाव विधानसभा मतदार संघातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आमदार डॉक्टर सुधीर तांबे,पक्ष निरीक्षक प्रदीप पवार,जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांच्या उपस्थितीत बोलतांना अँड आहेर यांनी काँग्रेसच्या भावी वाटचालीची दिशाच स्पष्ट केली मतदारसंघातील दृष्ट राजकारण थांबवायचं असेल तर शिवसेना - भाजपा सोबतच मित्रपक्षालाही बाजूला ठेवावं लागेल.असा आमदार पंकज भुजबळ यांना अप्रत्यक्ष विरोध करीत हवं तर उमेदवारी मलाही  उमेदवारी  देऊ नका  पण  नांदगावची जागा काँग्रेसला सोडा  अशी मागणी त्यांनी केली आमदार डॉक्टर सुधीर तांबे,जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे व निरीक्षक प्रदीप पवार यांनी नांदगाव विधानसभा मतदार संघातील सध्याच्या राजकीय परिस्थीचा आढावा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सादर करण्याचे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले उदय पवार यांनी प्रास्ताविक केले माजी नगराध्यक्ष चेतन पाटील यांनी आभार मानलें 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandgaon melava