नदीपात्रात होल्डींग काढले,पण कॉक्रीट मात्र कायम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नाशिकः नंदिनी नदीपात्रातील होल्डींग प्रशासनाने काढले असले तरी नदीपात्रात खड्डे करुन आणि कॉक्रीट ओतून उभारलेल्या होल्डींगचे कॉक्रीट खड्डे मात्र कायमच 
आहे. त्यामुळे कॉक्रीट खड्डे काढण्याचा मूळ उद्देशच दुर्लक्षित आहे. 

नदीपात्रातील खड्डे करणे नदीपात्राचा प्रवाह बदलणे त्यात खड्डे करणे अशा नानाविध प्रकारच्या विद्रुपीकरणाचे काम अजूनही थांबलेले नाही. नदीपात्रात जाहीरातीसाठी उभारलेले होल्डींगविरोधात तक्रारी आल्यानंतर प्रशासनाने होल्डींग काढले. पण त्यानंतरही नदीपात्रात काही भागात खड्डे कायम आहे. पूलांच्या नावाखाली कॉक्रीटी ओतण्याचे कामही 
सुरुच आहे. काही दिवसांपूर्वीच नंदीनी नदीपात्रात सार्वजनिक प्रसाधन गृह उभारण्यात आले. यापूर्वी अतिक्रमण झाली आहेच त्यानंतरही प्रसाधन गृह आणि टाकळी भागात पूलाचे काम सुरु आहे. 

सध्या नदीपात्रातील होल्डींगचा विषय गाजतो आहे. ज्या होल्डींगवरुन गदारोळ झाला. प्रशासनाला होल्डींग काढावे लागले. अशा होल्डींगचे कॉक्रीट खड्डे मात्र कायमच आहे. नदीपात्रातील खड्डे आणि कॉक्रीटकरणाला प्रशासनाने अजून धक्काही लावलेला नाही. त्यामुळे आज राजेश पंडीत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देउन कॉक्रीटीकरणाचे खड्डे काढण्याची मागणी केली. 
 
Web Title: MARATHI NEWS NANDINI INCHROCHMENT