नांद्रा येथे छत पडून आजी व नातवाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

नांद्रा (ता.पाचोरा) : येथे शुक्रवारी (4 ऑक्‍टोंबर) रात्री घराचे छत पडून त्यात दबल्याने आजी व नातवाचा मृत्यू झाला. सदर घटना रात्री अकराच्या सुमारास घडली असून, अन्य तिघेजण बचावले आहे. 

नांद्रा (ता.पाचोरा) : येथे शुक्रवारी (4 ऑक्‍टोंबर) रात्री घराचे छत पडून त्यात दबल्याने आजी व नातवाचा मृत्यू झाला. सदर घटना रात्री अकराच्या सुमारास घडली असून, अन्य तिघेजण बचावले आहे. 
नांद्रा येथील पाटील कुटूबांवर काळाने अचानक घाला घातला. भाड्याने रहात असलेल्या नवेगावातील मातीच्या घराचे छत कोसळल्याने त्याच्या खाली दबून शोभाबाई नामदेव पाटील (वय 50) व नुकताच डिलेवरी झालेल्या मुलीचा अवघ्या सव्वा वर्षाचा मुलगा समर्थ संदिप पाटील (रा.लोण, ता.एरंडोल) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबातील अन्य तीन सदस्य एक मुलगा व दोन मुली यांना वाचविण्यात यश आले.तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. कुटूंबातील आधारवड शोभाबाई नामदेव पाटील पतीच्या निधनानंतर प्रतिकुल परिस्थितीशी झुंज देत त्या कुटूबांचा गाढा ओढत असताना त्यांचा कुटुंबावर हा अनपेक्षित कोसळलेल्या दुःखाचा डोंगरमुळे कुटूंबवार मोठा आघात झाला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandra house slab 2 death

टॅग्स