धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील आमचूर प्रकल्पाला अखेर मान्यता

प्रकल्पाचे आधारभूत सर्वेक्षण करून त्याची उपयुक्तता तपासण्यात येणार आहे
Minister Adv. K.C. Padvi
Minister Adv. K.C. PadviMinister Adv. K.C. Padvi
Updated on

नंदुरबार : मानव विकास मिशन अंतर्गत धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात आमचूर उत्पादक आदिवासींच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी 'आमचूर निर्मिती व विक्री' हा प्रकल्प शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत (Shabari Tribal Finance and Development Corporation) राबविण्यास प्रशासकीय (Government) मान्यता देण्यात आली आहे. राज्याचे आदिवासी ‍ विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी (Minister Adv. K.C. Padvi) यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

(approval amchoor project in dhadgaon and akkalkuwa)

Minister Adv. K.C. Padvi
महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध

धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात तयार होणाऱ्या आमचूराला त्याच्या विशिष्ट गुणवत्तेमुळे देशांतर्गत आणि देशाबाहेर मोठी मागणी आहे. या व्यवसायात दरवर्षी मोठी आर्थिक उलाढाल होते. आंब्यांची झाडे मोठ्या प्रमाणात असून येथील नागरिकांचे आमचूर तयार करणे हे उपजिविकेचे महत्वाचे साधन आहे. स्थानिक स्तरावर प्रक्रीया व विक्री केंद्र झाल्याने आमचूराला चांगला दर मिळून आदिवासी कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
प्रकल्पाचे आधारभूत सर्वेक्षण करून त्याची उपयुक्तता तपासण्यात येणार आहे.

Minister Adv. K.C. Padvi
दैव बलवत्तर म्हणूनच ‘तौक्ते’ चक्रीवादळातून सुखरूप परतलो !

अशी असेल योजना

व्यक्तिगत लाभार्थी, आदिवासी समाज, संस्था यांचा प्रकल्पात १० टक्के स्वनिधी असेल, तर ९० टक्के शासनाचा हिस्सा असेल. ६ कोटी ५ लाखाच्या प्रकल्पासाठी ५ कोटी ४४ लक्ष ५० हजार एवढ्या शासनाच्या हिश्यास मान्यता देण्यात आली आहे. उर्वरीत ६० लक्ष ५० हजार स्वनिधीतून गोळा होईल. त्यापैकी आमचूर खरेदीसाठी २ कोटी खेळेत भांडवल, आमचूर उत्पादनासाठी अर्थसहाय्य ६० लाख, आमचूर प्रक्रीया, विक्री व वाळविणे यासाठी २ कोटी, ग्रामीण स्तरावर साठवणुकीसाठी वन धन केंद्र किंवा ग्राम संघ यांना १० लाख, आदिवासी कुटुंबातील सदस्यांना स्वच्छ आमचूर निर्मिती, सौर वाळवणी यंत्राचा वापर व आमचूरावर प्रक्रीया करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी ८० लाख आणि ५५ लाख रुपये व्यवस्थापन खर्च असेल.

Minister Adv. K.C. Padvi
दिलासादायक ! जळगाव जिल्ह्यातील २५ कोविड केअर सेंटर बंद

विविध उपयोजनांचा समावेश

-ग्राम संघ किंवा वन धन केंद्रांना आमचूर खरेदीसाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रक्रीयेतून ४०० क्विंटलपर्यंत आमचूर खरेदी करून स्थानिक ठिकणी उपलब्ध शितगृहात साठवणूक करण्यात येईल.

-चांगल्या प्रतीचे आमचूर खरेदी करण्यासाठी ग्राम संघ किंवा वन धन केंद्रांतील सभासदांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून एक ग्राम संघ किंवा वन धन केंद्रातील ३०० आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब २००० रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

-ग्राम संघ किंवा वन धन केंद्रांतील सभासदांना आमचूर वाळविणे व त्यावर प्रक्रीया करून विक्री करणे यासाठी सहाय्य करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून सुरूवातीच्या टप्प्यात अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील १० ग्रामसंघ/वन धन केंद्रांना डीबीटीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

-ग्राम संघ किंवा वन धन केंद्रांना आमचूराची साठवणूक करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील १० ग्रामसंघ/वन धन केंद्रांना प्रत्येकी १ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

-आदिवासी कुटुंबातील सदस्यांसाठी स्वच्छ आमचूर निर्मिती, सौर वाळवणी यंत्राचा वापर व आमचूरावर प्रक्रीया याबाबत प्रशिक्षण देणे अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात ३०० सभासदांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com