
शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली. प्रशासनाने प्राप्त झालेली मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी तालुका स्तरावर नियेाजन केले होते.
नंदुरबार : दोन वर्षांत अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत शासनातर्फे कोरोनाच्या संकटकाळात मदतीचा हात दिल्याने बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत २५ कोटींपेक्षा अधिक मदतीचे वाटप झाले आहे.
आवश्य वाचा- बीएचआर’ घोटाळ्यातील ‘म्होरक्या’ला पोलिस कधी पकडणार ?
जुलै ते ऑक्टोबर २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत १२ हजार १५० शेतकऱ्यांना १६ कोटी ५२ लाखांची मदत देण्यात आली. नंदुरबार तालुक्यात चार कोटी ६५८ लाख (दोन हजार ७५४ शेतकरी), नवापूर ५३ लाख ६८ हजार (एक हजार १३५), शहादा सहा कोटी ९९ लाख (तीन हजार ३६१), तळोदा दोन कोटी ८३ लाख (दोन हजार ६९९), अक्कलकुवा ९६ लाख ३४ हजार (एक हजार १००) आणि अक्राणी तालुक्यात ५४ लाख २८ हजार (एक हजार १०१ शेतकरी) मदतीचे वाटप करण्यात आले.
जून ते ऑक्टोबरदरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत १६ हजार १२४ शेतकऱ्यांना आठ कोटी ६० लाखांची मदत देण्यात आली. नंदुरबार तालुक्यात ३२ लाख पाच हजार (४७२ शेतकरी), नवापूर एक कोटी ५६ लाख (चार हजार ८३६), शहादा ९० लाख ४८ हजार (एक हजार २९९), तळोदा ४४ लाख ७८ हजार (९०४), अक्कलकुवा एक कोटी २८ लाख (दोन हजार ३६४) आणि अक्राणी तालुक्यात चार कोटी सात लाख (सहा हजार २४९ शेतकरी) मदतीचे वाटप करण्यात आले.
वाचा- मुलीला फुस लावून सैराट सारखे पळाले; मात्र पोलिसांनी शिताफीने पकडले, मुलीची सुखरुप सुटका -
मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली. प्रशासनाने प्राप्त झालेली मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी तालुका स्तरावर नियेाजन केले होते. २०१९ च्या मदतीपैकी ९९.७४ टक्के व २०२० च्या मदतीपैकी ९० टक्के रकमेचे वाटप करण्यात आले आहे. २०२० च्या उर्वरित रकमेचे वाटप तालुका स्तरावर सुरू आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे