कापूस खरेदीकडे सीसीआयचे दुर्लक्षच 

cci cotton
cci cotton

 
शहादा : सीसीआयतर्फे बाजार समितीमध्ये कापूस खरेदी सुरू करण्याचे शासनाचे आदेश असताना सीसीआयने येथील कापूस खरेदीकडे दुर्लक्ष केले आहे. शासनाच्या प्रतिनिधींसोबत बैठक होऊनही दिवसभरात कोणतीही हालचाल झालेली नाही. बाजार समितीला सीसीआयकडून पत्राची प्रतीक्षा असून ते आल्यांनंरचशेतकऱींकडून खरेदी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

लॉकडाऊनमध्ये हमीभावाने कापूस खरेदी सुरू करण्याबाबत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला शासनाचे आदेश आले आहेत. त्यानुसार सहाय्यक निबंधक निरज चौधरी यांच्या उपस्थितीत हमी भावाने कापूस खरेदी संबंधित सर्व घटकांची बैठक झाली. बैठकीत श्री. चौधरी, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, सचिव संजय चौधरी, सीसीआयचे केंद्र प्रमुख अरूण भाडाईत, श्रीजी कोटेक्सचे अजय गोयल, राधिका कॉटनचे कैलास पाटील, शैलेश पाटील आदी उपस्थित होते. 
बैठकीत कापूस खरेदीबाबत सविस्तर चर्चा करण्यांत आली. शेतकऱ्यांकडे कापूस पडून असल्याने खरीप हंगामाच्या दृष्टीने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याकरीता कापूस खरेदी त्वरित सुरू करण्याचे श्री. चौधरी व पाटील यांनी सुचविले. समितीने औरंगाबाद येथील भारतीय कॉटन फेडरेशन तसेच शहादा केंद्र प्रमुख अरूण भाडाईत यांना हमी भावाने कापूस खरेदी प्रत्यक्षात कधी सुरू करणार याबाबतचे पत्र दिले आहे. त्यात कापूस खरेदी केव्हापासून सुरू होईल याबाबतचा लेखी खुलासा समितीस करावा, जेणेकरून समितीस कापूस विक्री करणाऱ्या शेतकरी बांधवांची नोंदणी करणे व त्यांना टोकन देण्याबाबत पुढील कार्यवाही करता येणे शक्य होणार आहे. 

शहादा केंद्रावर सर्वाधिक खरेदी 
याअगोदर शासनाने हमी भावाने खरेदी करण्यांचे आदेश दिल्यानंतर बाजार समितीने लगेचच १४ नोव्हेंबर पासुन कापूस खरेदी केंद्र सुरू केले होते. हे केंद्र १४ मार्चपर्यंत सुरू होते. केंद्रात उपरोक्त कालावधीत एक लाख ७८ हजार ६५२ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून त्यापोटी शेतकरींना ९६ कोटी ८३ लाख ६२ हजार ६२७ रुपये अदा करण्यांत आले आहेत. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाची खरेदी शहादा येथील खरेदी केंद्रावर झाल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले. 
 
सीसीआयकडून पत्रानंतर खरेदी 
कापूस खरेदीबाबत संबंधितांकडून लेखी सूचना प्राप्त झाल्यानंतर नाव नोंदणी बाबत शेतकऱ्यांना कळविण्यात येईल, असे सभापती पाटील यांनी सांगितले. कापूस खरेदी लवकर सुरू व्हावी याबाबत समिती प्रयत्नशिल असल्याचेही सभापती यांनी सांगितले. आमदार राजेश पाडवी यांनी जिल्हाधिकारी तसेच व सीसीआयच्या अधिकाऱ्यांना कापूस खरेदी केंद्र शासनादेशाप्रमाणे २० एप्रिलपासून सुरू करणेसाठी सूचित केले होते. पण कोणतीही कार्यवाही नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com