
नेहरू यांच्यावर भाषण, पत्रलेखन, पाच मिनिटांची डॉक्युमेंट्री कवितावाचन, एकपात्री नाट्यछटा तसेच निबंध लेखन आधी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
शनिमांडळ (नंदुरबार) : १४ नोव्हेंबर बाल दिनानिमित्त बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बाल दिवस सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत नेहरू यांच्यावर भाषण, पत्रलेखन, पाच मिनिटांची डॉक्युमेंट्री कवितावाचन, एकपात्री नाट्यछटा तसेच निबंध लेखन आधी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पहिल्या तीन विद्यार्थ्यांसाठी बक्षीस देण्यात येणार आहे.
आठ नोव्हेंबरला पहिली ते दहावी वर्गातील मुलांनी ‘मी नेहरू बोलतोय’ या विषयावर तीन मिनिटांचा व्हिडिओ अपलोड केला. ९ नोव्हेंबरला तिसरी ते पाचवी वर्गातील मुलांसाठी चाचा नेहरू यांच्यावर पत्रलेखन कार्यक्रम झाला. दहा नोव्हेंबरला इयत्ता सहावी ते आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांनी पंडित नेहरू यांच्या जीवनावर स्वलिखित कविता वाचन करून व्हिडिओ अपलोड करावा. ११ नोव्हेंबरला याच वर्गातील विद्यार्थ्यांनी एकपात्री नाट्यछटा व्हिडिओ प्रसारित करावा. १२ नोव्हेंबरला नववी ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना स्वतंत्र संग्रमातील नेहरुंच्या जीवनावर आधारित प्रसंग चित्र रेखाटून त्यानंतर ते अपलोड करावा लागणार आहे. याच दिवशी स्वातंत्र्य संग्रामातील नेहरूंचे योगदान नेहरू औद्योगिक विकासाचा पाया रचणारे, नेहरू विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर अकरावी ते बारावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन आयोजित केले आहे. १३ नोव्हेंबरला नववी व दहावी विद्यार्थ्यांना नेहरू स्वातंत्र्यानंतर देशाची जडणघडण आतील वाटा आणि भारताचा शोध आत्मचरित्र या विषयांवर निबंध लिहून तो अपलोड करावा लागणार आहे.
ई-संमेलन
याच वर्षी अकरावी व बारावी वर्गातील विद्यार्थ्यांना नेहरूंच्या जीवनावर आधारित पाच मिनिटांची डॉक्युमेंटरी तयार करावी लागणार आहे. १४ नोव्हेंबरला पहिली ते बारावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही संमेलन आयोजित केले जाणार आहे. या ई-संमेलनात नेहरूंना संबंधित कथा-कविता प्रसंग सादर केले जाणार आहेत. या उपक्रमात तालुका, जिल्हा स्तरावर पारितोषिके ठेवण्यात आले आहे. यासाठी मात्र विद्यार्थ्यांना पालक शिक्षक यांच्या फेसबुक अकाऊंटवरून व्हिडिओ फोटो अपलोड करण्यास अनुमती दिली आहे.
संपादन ः राजेश सोनवणे