esakal | सीटीस्‍कॅन केंद्राच्याच स्‍कॅनिंगची गरज; निश्चितदराच्या दुप्पट आकारणी
sakal

बोलून बातमी शोधा

ct scan

कोरोना बाधितांची संख्या पाच हजारपेक्षा जास्त झाली आहे. काही नागरिक खासगी स्वरूपात तपासणी करून घेत आहेत. काही नागरिक वैयक्तिकरीत्या सीटीस्कॅन तपासणी करून घेत आहेत. मात्र सीटीस्कॅन चालकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये शुल्क आकारले जात आहे.

सीटीस्‍कॅन केंद्राच्याच स्‍कॅनिंगची गरज; निश्चितदराच्या दुप्पट आकारणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : जिल्ह्यातील सिटीस्कॅन चालकांकडून नागरिकांची आर्थिक लूट केली जात आहे. राज्य शासनाने दोन ते तीन हजार रुपये प्रति सिटीस्कॅनचे दर निश्चित केले असतानाही त्याचे उल्लंघन होत आहे. याबाबत शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांना येथील शासकीय विश्रामगृहावर निवेदन देत नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्या केंद्र चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

नक्‍की वाचा- गुराख्याला तरंगणारा मृतदेह दिसला; धावतच सुटला
 

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पाच हजारपेक्षा जास्त झाली आहे. काही नागरिक खासगी स्वरूपात तपासणी करून घेत आहेत. काही नागरिक वैयक्तिकरीत्या सीटीस्कॅन तपासणी करून घेत आहेत. मात्र सीटीस्कॅन चालकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. वास्तविक नागरिकांची आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी राज्यशासनाने २४ सप्टेंबरच्या परिपत्रकानुसार सीटीस्कॅनरसाठी दोन ते तीन हजार रुपये असा दर निश्चित केलेला आहे. डॉक्टरच्या प्रिस्क्रीप्शन्स शिवाय सीटी स्कॅन करू नये असे आदेशही दिले आहे. शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारणी केली जात असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अथवा महानगरपालिकेचे आयुक्त यांची सक्षम प्राधिकारी म्हणून अधिकार दिले आहेत. 

हेपण वाचा- होमक्‍वारंटाईन होणारे घेताय ऑक्‍सीमीटर; पण जरा सांभाळा

जिल्ह्यात सीटीस्कॅन सेंटर चालकांकडून शासनाने ठरवून दिलेले दर आकारणीची सक्ती करण्यात यावी. जास्त दर आकारणी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी केली. जिल्ह्यातील सीटीस्कॅन चालकांनी शासकीय दरानेच स्कॅनिंग करावे असे आदेश देऊन जनतेची आर्थिक फसवणूक टाळावी. निवेदनावर श्री. चौधरी यांच्यासह शहर प्रमुख तुषार पाटील, माजी नगरसेवक विनोद चौधरी, तालुका उपप्रमुख रमेश कुंवर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.