मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते जलतरण तलावाचे आज ई-लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

जलतरण तलावाचे ई-लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी (ता. ८) छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दुपारी तीनला होणार आहे.

नंदुरबार : नंदुरबार नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे ई-भूमिपूजन व (स्व.) बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे ई-लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी (ता. ८) छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दुपारी तीनला होणार आहे. 
नगर विकास, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी राहतील. खासदार संजय राऊत यांची विशेष उपस्थिती असेल. कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे, आदिवासी विकास तथा पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी, पालकमंत्री अब्दुल सत्तार (धुळे), जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, खासदार डॉ. हीना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी, आमदार सुधीर तांबे, आमदार शिरीषकुमार नाईक, आमदार राजेश पाडवी, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, आमदार मंजुळा गावित (साक्री), शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे, जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. राम चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावंडे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कोविड संदर्भातील शासकीय नियमांना बांधिल राहत उपस्थितीचे आवाहन नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्षा भारती राजपूत, बांधकाम सभापती दीपक दिघे, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar cm uddhav thackeray swiming tank online opening