ग्रीन झोन म्हणून गाफिलपणा नकोच 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चेनंतर कदाचित टप्याटप्याने ग्रीन झोनमधील जिल्ह्यांमधील लॉकडाऊन उठविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना १४ एप्रिलनंतर जिल्ह्यातील लॉकडाऊन उठेल असे वात आहे.मात्र तसा विचार न करता नागरिकांनी लगतच्या धुळे व मध्यप्रदेश आणि नाशिक जिल्ह्यातील रूग्णांची संख्या लक्षात घेता.

नंदुरबार ः जिल्ह्यात १६ मार्चपासून संचारबंदी व जमावबंदी, त्यानंतर २२ मार्चपासून उद्या (ता.१४) लॉक डाऊनचे २१ दिवस पूर्ण होत आहेत. या काळात कोरोनाला जिल्ह्यात नो एंट्री मिळाली. शासन -प्रशासनाचा योग्य नियोजनामुळे व दात्यांचा सहकार्यामुळे हा काळ निर्विघ्न पार पडला आहे. त्यामुळेच नंदुरबार जिल्हा ग्रीन झोन मध्ये आहे. मात्र, नागरिकांनी ग्रीन झोनच्या आनंदात गाफील राहणे उचित ठरणार नाही. धोका अद्यापही टळलेला नाही. 

कोरोना विषाणूचा संसर्गाने साऱ्यांचाच मनात भीतीचे घर केले आहे. २१ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोनाचा संशयित रूग्ण आतापर्यंत सापडला नाही ही समाधानाची बाब आहे. तरीही जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाने केलेल्या आवाहनाकडे कुठे ना कुठे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे उपाययोजनांची व प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन कठोरपणे होतांना दिसले नाही. अर्थात प्रशासनाने नागरिकांना सामंज्यस्याने समजाविण्याचा प्रयत्न केला. २१ दिवसात इतर जिल्ह्यात ज्याप्रमाणे पोलिसांना त्रास झाला,तशी परिस्थिती येण्याची वेळ नंदुरबार जिल्ह्यात आली नाही. त्यामुळे २१ दिवसाचे लॉकडाऊन अत्यंत शांततेत व नियोजनबद्ध पार पडले. मात्र महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

काही बोटावर मोजण्या इतपत नागरिक वगळता इतर नागरीकांनीही लॉकडाऊनची गांर्भीर्याने दखल घेतली. त्यात , व्यावसायिक, शेतकरी,व्यापारी, मजूर वर्ग यांना अत्यंत त्रास झाला. अनेक दात्यांनी गरिबांचा मदतीसाठी हात पुढे केले. नंदुरबार जिल्ह्यात एकही रूग्ण नसल्याने नागरिक गाफील वाटू लागले आहेत. आपल्या जिल्ह्यात कोरोना नाही, असे म्हणत बिनधास्त दिसून येत आहेत.त्यामुळे आता अनेकांना बाहेर पडण्याची घाई लागली आहे. तरी नागरिकांनो, गाफील राहू नका, अजून घरातच राहा, काळजी घ्या, प्रशासनाचा आदेशाचे पालन करा.तुमचा गाफीलपणा कदाचित धोकादायक ठरू शकेल. 

नंदुरबार जिल्हा ग्रीन झोनमध्ये 

शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चेनंतर कदाचित टप्याटप्याने ग्रीन झोनमधील जिल्ह्यांमधील लॉकडाऊन उठविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना १४ एप्रिलनंतर जिल्ह्यातील लॉकडाऊन उठेल असे वात आहे.मात्र तसा विचार न करता नागरिकांनी लगतच्या धुळे व मध्यप्रदेश आणि नाशिक जिल्ह्यातील रूग्णांची संख्या लक्षात घेता. स्वयंस्फूर्तीने दोन दिवसापासून ज्या प्रमाणे गावपातळीवर नागरिक पुढे सरसावले आहेत.तो जोर कायम राहू देणे आवश्‍यक आहे. लॉकडाऊन उठले तरी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन मात्र करावेच लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Nandurbar corona virus Green zone