नंदुरबार कोरोना’बाबत नियंत्रण कक्षांची स्थापना

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 March 2020

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी
जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापनेचे आदेश दिले होते. त्यानुसार कक्ष स्थापन करण्यात आले

नंदुरबार : कोरोना विषाणूचा प्रसाराबाबत नागरिकांच्या शंकांचे व समस्यांचे समाधान करण्यासाठी आणि कार्यवाहीत सुसूत्रता आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी
जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापनेचे आदेश दिले होते. त्यानुसार कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२५६४-२१०००६ असा आहे. या क्रमांकावर नागरिकांना आपल्या सूचना अथवा तक्रारी सादर करता येतील. जिल्हा रुग्णालयासाठी ०२५६४-२१०१३५ ,रेल्वे स्टेशनसाठी ९००४४७१९४० असा, तर खांडबारासाठी ०२२६७ - ६४२३४८, नवापूर रेल्वे स्टेशन ०२२६७ - ६४२३५७ , जिल्हा परिषद आरोग्य विभाग ९४२३३७८२७९, पोलिस नियंत्रण कक्ष ०२५६४-२१०११३ असे संपर्क क्रमांक आहेत.
तालुकास्तरावर संबंधित तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांचे संपर्क क्रमांक शहादा (०२५६५-२२४५००/९४२०६२३६३४), तळोदा (०२५६७- २३२३६७/९४०४३७५९७९), अक्कलकुवा (०२५६७-२५२२२६/८००७०६८४१९), नवापूर (२५६९- २५००४०/८६०५७५५९५४), अक्राणी (०२५९५-२२०२३२/९४०४५८६१४०) आणि नंदुरबार (०२५६४- २३२२६९/८६०५९१६३४६) असे आहेत.
नागरिकांनी केवळ कोरोना आजाराबाबतच नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. चुकीची आणि खोडसाळपणे माहिती देणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी या सुविधेचा उपयोग करून जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. नियंत्रण कक्षाकडून प्रत्येक घटना अथवा माहितीची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar corona virus help center