नंदुरबार होतेय हॉटस्पॉट...आणखी तिघे पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

नंदुरबार जिल्हा हा आतापर्यंत सेफ मानला जात होता. राज्यात सर्वत्र कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून येत असताना नंदुरबारमध्ये मात्र अद्यापपर्यंत पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आलेला नव्हता.

नंदुरबार : शहरातील "कोरोना' पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील तीन जणांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या चार झाली आहे. प्रशासनाला आज सायंकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर तातडीने संबंधितांना जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहे. 

क्‍लिक करा - लॉकडाउनमध्ये जिल्ह्यात याला मिळाली सशर्त सुट...पेट्रोलबाबत हा आहे निर्णय

शहरातील वॉर्ड क्रमांक दहामधील परिसरात एका 48 वर्षीय व्यक्तीचा अहवाल "कोरोना' संसर्गाचा पॉझिटिव्ह आला आहे. ही घटना शुक्रवारी समोर आली होती. त्यानंतर प्रशासनाने त्या रुग्णाचा कुटुंबीयांसह त्यांच्या संपर्कात आलेले 34 जणांना ताब्यात घेतले होते. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांना होळ शिवारातील विलगीकरण कक्षात हलविण्यात आले होते. त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात बाधीताच्या कुटुंबातील आई, मुलगा आणि मुलगी या तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा अहवाल प्रशासनाला नुकताच प्राप्त झाला असून त्यात त्यांच्या पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे माहिती आहे. या तिघांना जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात हलविण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहे. 

नंदुरबारमधील संख्या चार 
नंदुरबार जिल्हा हा आतापर्यंत सेफ मानला जात होता. राज्यात सर्वत्र कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून येत असताना नंदुरबारमध्ये मात्र अद्यापपर्यंत पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आलेला नव्हता. मात्र पाच दिवसांपुर्वी एका व्यक्‍तीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्याच्या कुटूंबासह संपर्कातील व्यक्‍तींना तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. यात कुटूंबातील तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तिघांच्या अहवालानुसार आता नंदुरबारमधील कोरोना पॉझिटिव्हची संख्या चार झाली आहे. यामुळे प्रशासन आता चांगलेच हादरले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar corona virus three porson possitive report