कोरोनोचा शिरकाव टाळण्यास महिलांना हवे प्रशिक्षण! : सुलभा महिरे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 May 2020

नंदुरबार जिल्हा सुदैवाने कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहेत. आज शहर आणि जिल्हयात कोरोनाचे नाममात्र रूग्ण राहिले असून नवीन बाधित रूग्ण गेल्या दहा दिवसात आढळलेला नाही. शहाद्यातील संख्याही नील झाली आहे.

जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उध्दारी" या सुविचाराप्रमाणे कुटूंबव्यवस्थेत महिलांचे स्थान सर्वोच्च्य आहे. एक स्वच्छ, सुंदर, आरोग्यमय व विकसित घराची सर्वांधिक जबाबदारी तिच्यावरच असते. अशा वातावरणात आज कोरोनाला घरात शिरकाव करू द्यायचा नसेल तर निरर ते साक्षर महिलांना याबाबतचे प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. केवळ साबणाने हात धुवा इथपर्यत कोरोनाला अटका करता येणार नाही तर दररोजघरात येणाऱ्या असंख्य वस्तू हाताळताना कायदक्षता घ्यायला पाहिजे हे आज समजण्यापलिकडे चालले आहे. त्यामुळे महिलांना याविषयी धिक दक्षता घेत त्याबबात माहिती देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे फ्रिडम मेडिकल रिलीफ मिशनच्या अध्यक्ष सुलभा महिरे यांनी सांगितले. 

नंदुरबार जिल्हा सुदैवाने कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहेत. आज शहर आणि जिल्हयात कोरोनाचे नाममात्र रूग्ण राहिले असून नवीन बाधित रूग्ण गेल्या दहा दिवसात आढळलेला नाही. शहाद्यातील संख्याही नील झाली आहे. अशा स्थितीत दुसरीकडे राज्यातील लॉकडाऊन पुन्हा ३१ मे पर्यत वाढविण्यात आले आहे. कोरोनाशी दीर्घकाळ लढा द्यावा लागणार आहे असे जिल्हा प्रशासनानेही सूचित केले आहे. यातून एकच बोध घेणे गरजेचे आहे, तो म्हणजे कोरोनाशी सहजरित्या घेणे योग्य ठरणार नाही, उलट अधिक सतर्कता घेण्याची गरज आहे. 

शासन/प्रसाशनाकडून वारंवार कोरोनाविषयी जनजागृती केली जात आहे. मास्क लावणे, लॉकडाऊन पाळणे, दोन व्यक्ति मध्ये २ मीटर अंतर ठेवणे व वारंवार हात धुणे या पध्दतीचा जनमाणसात ब-याच प्रमाणात जागृती झाली आहे. मात्र घरात वावरत असताना महिलांना अनेक विषय हाताळावे लागतात. जसे घरात दररोज मार्केटमधून येणारा भाजीपाला, पिठाच्या गिरणीतून येणारे पिठ, तबेल्यातून येणारे दूध, मटण, मासे,अंडी अशा प्रकारच्या अनेक बाहय वस्तूंचा शिरकाव होत असतो. या बाहेरून येणा-या पदार्थावर जर कोरोना विषाणू असतील तर त्यांचा घरात शिरण्याआधी नायनाट महिलांनी कशा पध्दतीने करावा याविषयी महिलांना प्रशिक्षण असणे अत्यंत महत्वांचे वाटते. 

कोरोनाविषयी अपुर्ण ज्ञानामुळे ब-यांच प्रमाणात महिला वर्गही गोंधळलेला आहे. बाहेरून येणारा व्यक्ति, पाहुणे असो कि घरातील व्यक्ती यांचे कपडे, चप्पल, मोटरसायकल यासर्व वस्तू त्या घरातील गृहिणीला हाताळाव्या लागतात. जर तिला हे हाताळतांना कोरोनाची पार्श्वभूमी माहिती असेल तर ती घरात येणा-या कोरानाचा शिरकाव रोखू शकेल. म्हणूनच महिलांना शासन पातळीवर जनजागृतीची गरज आहे. ती वैद्यकिय विभागामार्फत शक्य होऊ शकते. घरात लहान मुले असतात, जे दुकांनावरून चॉकलेट बिस्किट अन्य पदार्थ घरी आणून खातात, मात्र या दुकानातून येणा-या वस्तू नक्कीच कोरानामुक्त असतील का असा प्रश्न पडतो. या वस्तूंचा घरात शिरकावाआधी त्यांना कशा पध्दतीने विषाणूमुक्त करता येईल याच्या विविध पध्दती महिलांना समजविणे गरजेचे आहे. 
घरात बाहेरून येणा-या काम करणा-या महिला घरात येण्याआगोदर महिलांनी काय केले पाहिजे, तसेच घरात किंवा घराबाहेर पाळीव प्राणी असतात, त्यांच्याबाबत काय दक्षता घेतली पाहिजे हेही तिला अवगत केले गेले पाहिजे. रामायण, महाभारत घरात बसून महिला पाहत असतात तसेच जर महिलांसाठी जिल्हा पातळीवर, या अन्य प्रकारे दुरदर्शन, टि.व्ही. मार्फत कोरोना व्हायरस रोखण्यासाठी तज्ंज्ञाकडून मार्गदर्शन करण्याची गरज आहे. ही दखल बारीक-सारीक वाटत असली तरी महिलावर्गाची जनजागृतीची ताकद कोरोनाला हरवण्यासाठी महत्त्वाची ठरेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar corona virus women training