esakal | आकाशवाणीचे धुळे केंद्र... आता ऐकणार आहे मराठी विषयाच्या अभ्यासक्रमा संदर्भात... 
sakal

बोलून बातमी शोधा

akashvani kendra

लॉकडाउनमुळे दूर शिक्षणाला तंत्रज्ञानाची सांगड घालीत शालेय शिक्षण नवीन वळणावर जात आहे. शाळा भरेल आणि रोज दोन तास शालेय अभ्यासक्रम शिकवता जाईल, मात्र शाळेत न जाता घरात बसून तो पूर्ण केला जाणार आहे.

आकाशवाणीचे धुळे केंद्र... आता ऐकणार आहे मराठी विषयाच्या अभ्यासक्रमा संदर्भात... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सारंगखेडा : नमस्कार मित्रांनो, आकाशवाणीचे हे धुळे केंद्र आहे. आता ऐकणार आहे सहावीच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमा संदर्भात... हे शब्द आता शालेय विद्यार्थ्यांच्या कानी पडणार आहेत. जिल्हयातील एका तज्ञ विषय शिक्षकाचा आवाज यापुढे नियमित ऐकायला मिळेल. लॉकडाउनमुळे दूर शिक्षणाला तंत्रज्ञानाची सांगड घालीत शालेय शिक्षण नवीन वळणावर जात आहे. शाळा भरेल आणि रोज दोन तास शालेय अभ्यासक्रम शिकवता जाईल, मात्र शाळेत न जाता घरात बसून तो पूर्ण केला जाणार आहे. शिक्षक , विद्यार्थी व आकाशवाणी ही सांगड कितपत उपयुक्त ठरेल हे येणारा काळच निश्चित करणार आहे. 

माध्यमिक शिक्षणाधिकारी मछिंन्द्रनाथ कदम यांनी या विषयी जिल्ह्यातील शिक्षकांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे स्वरूप त्यांना समजावले. आता त्याचे गुगल फॉर्म उपलब्ध करण्यात येतील. विषय शिक्षकांनी त्यात नाव, गाव, विषय, वर्ग, पाठाचे नाव आणि तो थेट रेडिओवरून शिकवण्यासाठी किती वेळ लागेल, हे त्यात भरायचे आहे. त्यानंतर पाच तज्ञ शिक्षक समिती निवड होईल. तेच शिक्षक रेडिओवर कार्यक्रम सादर करतील. यासाठी आकाशवाणी व दूरदर्शन माध्यमांनी पुढाकार घेतला आहे. 

क्‍लास घेण्याचे नियोजन सुरू 
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यास शाळा बंद आहेत. त्या किती काळ बंद राहतील, हे अद्याप समजणार नाही. झूम अॅप, वॉटस्अॅपच्या माध्यमातून मुलांचे वर्ग सध्या सुरु आहे. मात्र एक मोठी तफावत समोर आली असून जिल्हयात ७४ टक्के विद्यार्थ्याकडे स्मार्ट फोन उपलब्ध नसल्याने त्याचा फारसा प्रतिसाद नाही. विद्यार्थ्याचे नुकसान टाळण्यासाठी रेडिओ व दूरदर्शन संच हे साधन सहज उपलब्ध होणार आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने आकाशवाणीच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याची रूपरेषा अंतिम टप्प्यात असून सांग आकाशा, क्लास कसा घेऊ असे त्याचे नामकरण करण्यात आले. 

धुळे आकाशवाणी हा कार्यक्रम मोफत राबवणार आहे. विशेष म्हणजे, केवळ कोरोना संकट काळापुरता हा कार्यक्रम पुरता नव्हे तर भविष्यात नियमित तो सुरू राहणार आहे. त्यामुळे रेडीओला घराघरात ये आकाशवाणी केंद्र. हा आवाज घुमेल. धुळे आकाशवाणीचे सहकार्य लाभेल. पुणे विद्या परिषदेचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांचे मार्गदर्शन व शालेय शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांच्या संकल्पनेतून दूरदर्शनवरही उपक्रम सुरू होणार आहे. यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी सहकार्य करावे. 
- मछिंन्द्रनाथ कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी, नंदूरबार.
 

loading image
go to top