नंदूरबार जिल्ह्यात अलर्ट;वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्याने बाहेर जाणे टाळा.
नंदूरबार जिल्ह्यात अलर्ट;वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता



नंदुरबार : जिल्ह्यात शनिवारी (ता. २९) वादळी (storm) वारा, विजा व ढगांच्या गडगडाटासह पावसाची (Have Rain) शक्यता भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तविली असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क (Alert) राहावे. शेतकऱ्यांनी (farmer) आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.

( nandurbar district alert in have rain and storm)

नंदूरबार जिल्ह्यात अलर्ट;वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता
जळगाव जिल्ह्याला मोठा दिलासा; तीन महिन्यात मृत्युची नोंद कमी


तलाठी, मंडळ अधिकारी व तालुकास्तरीय अधिकारी यांनी मुख्यालय सोडू नये तालुका मुख्यालयाचा नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवावा. नागरिकांनी खबरदारी घेऊन कुठल्याही प्रकारची आपत्ती घडणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळावे. मोकळ्या जागेत असल्यास आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल, तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे, आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीचा आसरा घ्यावा. घराची बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये.


घरातील विजेची उपकरणे सुरू असतील, तर त्या वस्तू त्वरित बंद कराव्यात, तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहावे, पाण्यात उभे असल्यास तत्काळ पाण्यातून बाहेर पडावे, आकाशात विजा चमकत असल्यास घरातील दूरध्वनीचा वापर करू नये, शॉवरखाली अंघोळ करू नये. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाइपलाइन यांना स्पर्श करू नये. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे सुरू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूत किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नये. उंच झाडाखाली थांबू नये. धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नये. घरात असल्यास उघड्या दारातून किंवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. विजेपासून बचावासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com