मृत व्यक्तीची पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

लोणखेडा येथील त्या मृत व्यक्तीवर प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कोरोना नियमावली नुसार अंत्यसंस्कार झाले होते. त्यानंतर त्या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील एकूण सात व्यक्तींना मोहीदा येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

लोणखेडा : येथील कोरोना सदृश्य संशयित रुग्णांचा १४ जूनला मृत्यू झाला होता. लागलीच दुसऱ्या दिवशी त्यांचा अहवाल पॉझिटिव आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र आता त्यांच्या पत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे लोणखेडा ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.प्रशासनाने त्या परिसरात निर्जंतुकीकरण केले आहे. त्या महिला विलगीकरण कक्षातच होत्या. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. 

क्‍लिक करा - अरे देवा...कोरोनाच्या तक्रारी निवारण करणाऱ्याचा अहवाल आला पॉझिटिव्ह! 

लोणखेडा येथील त्या मृत व्यक्तीवर प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कोरोना नियमावली नुसार अंत्यसंस्कार झाले होते. त्यानंतर त्या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील एकूण सात व्यक्तींना मोहीदा येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी आज त्या मयत व्यक्तीच्या पत्नीचा अहवाल हा पॉझिटिव आला आहे.इतर सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने लोणखेडाकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्ण महिला मागील सात दिवसांपासून विलगीकरण कक्षात होती . त्यांची आता नंदुरबार येथे रवानगी करण्यात आली आहे. 

व्यवहार बंद 
लोणखेड्यात चार दिवस कडकडीत बंद असून फक्त दुग्धव्यवसाय सकाळी एक तास व सायंकाळी एक तास सुरू आहे. तसेच दवाखाने व मेडिकल नियमित वेळेनुसार सुरू आहेत. रूग्ण आढळून आलेल्या परिसरात ग्रामपंचायतीतर्फे निर्जंतुकीकरण केले जात असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. तसेच पूर्ण परिसरात बॅरिकेटिंग केली असून पोलीस प्रशासनातर्फे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत अशोक पाटील, पोलीस पाटील युवराज पाटील, सामाजिक कार्यकर्ते हरी पाटील , अरुण पाटील, दत्तू पाटील व ग्रामपंचायत कर्मचारी मेहनत घेत आहेत. 

मागील काही दिवसापासून गावात भरपूर अफवांना उधाण आले आहे. तरी कुणीही कोणत्याही अफवांना बळी न पडता नागरिकांनी घरी राहून स्वतःची काळजी घ्यावी. जोपर्यंत ग्रामपंचायत लोणखेडा व प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळत नाही तोपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नये. 
मकरंद नगिन पाटील,-स्वीकृत नगरसेवक. शहादा नगरपालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar district lonkheda village husband death and wife corona positive