esakal | लोटा बहादारांची संख्या वाढली 
sakal

बोलून बातमी शोधा

toilet no use

केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन अभियाना अतंर्गत विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना शौचालय उभारणीसाठी मुबलक निधी उपलब्ध करून दिला आहे.

लोटा बहादारांची संख्या वाढली 

sakal_logo
By
योगीराज ईशी

कळंबू (नंदुरबार) : ग्रामीण भागामध्ये शौचालय असून सुद्धा वापर न करता लोक उघड्यावर बसत आहे. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गावा-गावात शौचालय बांधलेले आहेत. मात्र याचा लोक उपयोग करत नसल्याचे पहायला मिळत आहे. एकप्रकारे शौचालयाचे तिनतेराच वाजले आहेत. तालुक्यामध्ये कोणतेही पथक सक्रिय नसल्याने उघड्यावर बसणाऱ्याच्या संख्येत आधिकच वाढ होताना दिसत आहे. ज्यांनी संडास बांधले आहेत. असे लोक सुद्धा उघड्यावर शौचास जात आहेत. 
केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन अभियाना अतंर्गत विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना शौचालय उभारणीसाठी मुबलक निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र या शौचालयाचा वापर न करता लाभार्थी ग्रामस्थ उघड्यावरच शौचास जात असल्याने या स्वच्छता अभियानाचा गावोगावी केवळ फज्जा उडाला आहे. प्रत्येक गावात प्रशासनाकडून देण्यात आलेल्या उदिष्टांची पूर्ती, तर ग्रामपंचायतीकडून झाली. मात्र अधिकाऱ्यांकडून व कर्मचाऱ्यांकडून ग्रामस्थांमध्ये जनजागृती न झाल्याने अनेक नागरिकांमध्ये अद्याप देखील शौचालयाबद्दल जनजागृती न झाल्याचे दिसून येत आहे. तसेच पाण्या अभावी नागरिक बाहेर जात असल्याचे म्हटले जाते. 

शौचालय तरीही उघड्यावर
तालुक्यातील गावामधील बंहुताश नागरिक हे घरामध्ये शौचालय असून देखील याचा वापर न करता उघड्यावर जातात. त्यामुळे शौचालय केवळ शोभेची वस्तुच बनत आहे. तसेच काही शाळा, तलाठी कार्यालय, व ग्रामपंचायतीच्या शौचालयाची अवस्था बिकट झाली आहे. तर काही ग्रामपंचायतीत अजून शौचालयच उपलब्ध नाही. अनेक गावात शिवार रस्त्यांवर ग्रामस्थ उघड्यावर शौचास जात आहेत. 

गुडमॉर्निंग पथकाची गरज 
पोलिस पाटील, सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य या बाबतीत लक्ष देण्याचे काम आहे. सर्वांकडे शौचालय आहेत. मात्र गुडमॉर्निंग पथक कार्यान्वित नाही. याला आळा घालण्यासाठी तालुकास्तरावर पथक नेमलेले पाहिजे. तालुक्यातील बहुतेक गावात पाण्याअभावी नागरिकांना बाहेर शौचालयास जावे लागते. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीच्यावतीने स्वच्छ भारत, अभियान या योजनेतून नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले पाहिजे.

संपादन ः राजेश सोनवणे