Loksabha 2019 : डॉ. समिधा निवडणूक लढविणारच 

बळवंत बोरसे
सोमवार, 8 एप्रिल 2019

नंदुरबार ः लोकसभेच्या नंदुरबार मतदारसंघात भाजपची उमेदवारी डॉ. हीना गावित यांना अधिकृतरीत्या जाहीर झालेली असताना, भाजपचे ज्येष्ठ नेते, संघपरिवाराचे जवळचे डॉ. सुहास नटावदकर यांची कन्या डॉ. समिधा यांनी उमेदवारी अर्ज घेत निवडणुकीच्या आखाड्यात आपणही असल्याचे स्पष्ट केले आहे. "एबी फॉर्म'चा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे त्यांनी स्पष्ट केल्याने नंदुरबार भाजपमध्येही सारेकाही "आलबेल' नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पक्षाने विचार न केल्यास त्या अपक्षही लढू शकतील, असा अंदाज राजकीय जाणकार वर्तवीत असल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. 

भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित उद्या (ता. 8) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. डॉ. समिधा नटावदकर यांनीही भाजपच्या म्हणून उमेदवारी अर्ज घेतल्याने डॉ. हीना गावित यांच्या उमेदवारीविषयी शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे भाजपचे उमेदवार नक्की कोण राहणार, या शक्‍यतेने पक्षातील वातावरण ढवळून निघाले असून, कार्यकर्तेही सैरभैर झाले आहेत. 
या पार्श्‍वभूमीवर डॉ. नटावदकर यांच्याशी संपर्क साधला असता; ते म्हणाले, की आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. पक्षाची आम्ही गेली अनेक वर्षे निःस्वार्थीपणे सेवा करीत पक्षवाढीसाठी योगदान दिले आहे. गेल्या वेळी आमचा विचार झाला नव्हता. पण, आम्ही पक्षाचे एकनिष्ठ असल्याने भाजपच्या उमेदवाराच्या निवडीसाठी प्रयत्न केले. यावेळी आम्हालाही संधी मिळेल, असे वाटत असताना ती न मिळाल्याने आम्ही रीतसर अर्ज घेत पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. 
पक्षाच्या वरिष्ठांनी आपल्याशी संपर्क केला आहे का, या प्रश्‍नावर थेट उत्तर न देता, ते म्हणाले, ""पक्षाचे अनेक वरिष्ठ आमच्या संपर्कात आहेत. आमची अनेक वर्षांची सल, पक्षाची केलेली सेवा आम्ही त्यांना बोलून दाखविली आहे. त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यामुळे आम्हाला उमेदवारीची आशा आहे. पाहूया पक्ष काय निर्णय घेतो ते!'' भाजपचा उमेदवार जाहीर झालेला असताना पक्षाने आपल्याला "एबी फॉर्म'विषयी काही आश्‍वासन दिले आहे का, यावर डॉ. नटावदकर यांनी "एबी फॉर्म' तसेच इतर सर्व बाबतींत पक्ष काय तो निर्णय घेईल, त्यावर आता बोलणे उचित नाही, असे सांगत निवडणुकीतील रंगत वाढविली आहे. 
डॉ. समिधा नटावदकर यांनी ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असली, तरी भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांनी प्रचाराला सुरवात केली आहे. त्या उद्या (ता. 8) मिरवणुकीने जात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पक्षात सुरू असलेल्या या घडामोडींचा नेमका काय परिणाम होतो आणि त्याचा शेवट कसा होतो? हे लवकरच स्पष्ट होईल. तोपर्यंत भाजपच्या उमेदवारीवरून सुरू असलेले संशयाचे वातावरण कायम राहणार आहे. 

भाजप पक्षपातळीवरील हालचाली! 
* डॉ. समिधा नटावदकर यांनी उमेदवारी अर्ज घेण्यामागील कारणांचा वेध घेतला असता, पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. हीना गावित यांच्याविषयी पक्षाने केलेला सर्वे आणि त्यातील कथित नकारात्मक बाबी. 
* शिवसेनेशी युती झालेली असली, तरी नंदुरबार शहर, तालुका वगळता शिरपूर, साक्रीतून आलेल्या मदत न करण्याच्या सुरांची पक्षाने घेतलेली गंभीर दखल. 
* डॉ. गावित यांनी शिवसेनेच्या तसेच पक्षातील जुन्या नेत्यांशी अजूनही न साधलेला संपर्क. 
* नाराजीतून पक्षाची ही "सीट' जाऊ नये म्हणून ऐनवेळी बदलाच्या "जळगाव पॅटर्न'चाही विचार. 
* उच्चशिक्षित डॉक्‍टर उमेदवाराच्या बदल्यात तसाच उमेदवार देण्याचा पर्याय खुला, असे मानणारा पक्षातील वरिष्ठांचा गट. 

Web Title: marathi news nandurbar dr samidha