आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी नंदुरबारमध्ये एकास अटक 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 November 2019

नंदुरबार ः अयोध्या प्रकरणी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या नंदुरबार भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यास अटक करण्यात आली आहे. अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर अफवा पसरवून कायदा सुव्यवस्था बिघडली जाऊ नये, यासाठी सतर्क असलेल्या नंदुरबार सायबर सेलने जिल्हाध्यक्ष केतन रघुवंशीला काल (ता. 8) मध्यरात्री अटक केली. 

अयोध्या प्रकरणाचा निकाल केव्हाही जाहीर होऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याचा दृष्टीने जिल्ह्यात पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शहरी व ग्रामीण भागात जनतेमध्ये जागृतीचे काम सुरू होते. जनतेची मानसिकता बदलविण्यासाठी शांतता समितीच्या बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात येत होते. तसेच सोशल मीडियावर कोणतेही आक्षेपार्ह पोस्ट न करण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत होते. काल अचानक अयोध्या प्रकरणाच्या निकालाबाबतचा निर्णय जाहीर झाला. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी सायबर सेल यंत्रणा कार्यान्वित केली. त्यात भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष केतन रघुवंशी यांनी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकली. ती तत्काळ सायबर सेलच्या लक्षात आली. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित व अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदवाळकर यांच्या पथकाने केतन रघुवंशी यांना त्यांच्या घरी जाऊन मध्यरात्री अटक केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar facebook post one arrest