ते कुटूंब मुंबईहून आले अन्‌ झाला नंदुरबारकरांचा घात...पुन्हा आठ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

कोरोनाचे दाखल १९ रूग्ण दोन दिवसापूर्वीच बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात एकही संसर्गित रूग्ण नसल्याने जिल्हा कोरोना मुक्त झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र दोन उलटत दिवस उलटत नाही तोच रजाळे (ता. नंदुरबार) येथील ६६ वर्षीय व्यक्ती मुंबईहून परतली. त्याला प्रारंभी त्रास होऊ लागल्याने जिल्हा रूग्णालयात जाऊन तपासणी केली.

नंदुरबार : रजाळे (ता. नंदुरबार) येथील ६६ वर्षीय व्यक्तीच्या कुटूंबातील सहा जणांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा रूग्णालयातील दोन कर्मचारी व शिंदखेडा (धुळे) येथील रहिवाशी असलेल्या एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे एकाच दिवसात कोरोना संसर्गित रूग्णांची संख्या आठ झाली आहे. दरम्यान, या रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान रजाळे येथील तरूणाच्या संपर्कात आलेल्या बलवंड (ता. नंदुरबार) येथील एका तरूणालाही आरोग्य विभागाने जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी आणले आहे. 

आवर्जून वाचा - जळगाव हादरले : त्या मृत इसमामुळे अनेकांना संसर्ग; तीस जणांचे अहवाल पॉझिटीव्ह 

कोरोनाचे दाखल १९ रूग्ण दोन दिवसापूर्वीच बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात एकही संसर्गित रूग्ण नसल्याने जिल्हा कोरोना मुक्त झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र दोन उलटत दिवस उलटत नाही तोच रजाळे (ता. नंदुरबार) येथील ६६ वर्षीय व्यक्ती मुंबईहून परतली. त्याला प्रारंभी त्रास होऊ लागल्याने जिल्हा रूग्णालयात जाऊन तपासणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्यासोबत मुंबईहून आलेले त्याची पत्नी, सून, दोन मुलगे व इतर नातेवाईक असे पाच जणांचे स्वॅब काल घेण्यात आले होते तर नऊ जण क्वॉरंटाईन करण्यात आले आहेत. त्या पाचही जणांचे अहवाल आज प्राप्त झाले. ते पॉझिटिव्ह आले आहेत. 
जिल्हा रूग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच इतर ठिकाणाहून आलेला मात्र येथील रूग्णालयात दाखल असलेल्या शिंदखेडा (धुळे) येथील एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आज कोरोनाची पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या नऊ झाली आहे. दरम्यान, रजाळे येथील पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात दोन दिवस असलेल्या बलवंड (ता. नंदुरबार) येथील एका तरूणालाही आरोग्य विभागाने आज ताब्यात घेतले आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar green zone two days and again 8 positive case