शहाद्यात घरांमध्ये शिरले पाणी; बारा तासात 160 मिमी पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

शहादा (जि. नंदुरबार) ः मध्यप्रदेशात व सातपुडा पर्वतरांगेत रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने शहरासह तालुक्‍यातील अनेक भागात पाणी साचले आहे. तालुक्‍यातील गोमाई, सुसरी, वाकी, कन्हेरी, उमरी, मंदाकिनी या प्रमुख नद्यांना महापूर आल्याने शहरात भयावह परिस्थिती असून नवीन वसाहतीमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. 

शहादा शहरातील स्टेट बॅंक, पंचायत समिती कार्यालय, विश्रामगृह, शेठ वि. के. शहा विद्यामंदिर, बसस्थानक, न्यायालय या इमारतीमध्ये चार ते पाच फूट पाणी आहे. तर शहादा- डोंगरगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून हॉटेल पटेल रेसिडेंसी चौक येथे कमरे एवढे पाणी आहे. गोमाई नदीला महापूर आल्याने शहादा तिखोरा रस्त्यावरील पूल व शहादा- पिंगाणा रस्त्यावरील दोन्ही पूल पाण्याखाली गेले आहेत. नदीचे पाणी दोन्ही पुलांवरून वाहत आहे. म्हसावद, वडाळी, वैजाली, कार्थदा पुनर्वसन वसाहत या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. गेल्या बारा तासात तालुक्‍यात सकाळी सात वाजेपर्यंत सरासरी 160 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून अद्यापही संततधार पाऊस सुरू आहे. 

बससेवा बंद 
रात्री पासूनच सततधार पाउस पडत असल्याने शहादा शहर जलमय झाले आहे. शहरातिल डोंगरगाव रोडला व दोंडाईचा रोडला नदिचे स्वरुप आले आहे. पुर्ण वाहतुक ठप्प झाली आहे. हीच परिस्थिती पुर्ण शहरभर असून संपुर्ण शहरात गल्लो गल्लित ठिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. जनजिवन पुर्शणपणे ठप्प झाले आहे. शहादा एस टी आगारातून रात्रीपासून % वाहतूक बंद करण्यात आली असून एकही बस सोडण्यात आलेली नाही. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar heavy rain 160 mm