हीना गावितांविरोधात उच्च न्यायालयात याचिका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

नंदुरबार : भाजपमधील बंड थांबविण्यात वरिष्ठांना अपयश येत असल्याचे चित्र आज नंदुरबारमध्ये दिसून आले. भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुहास नटावदकर यांनी भाजप उमेदवार डॉ. हीना गावितांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

नंदुरबार : भाजपमधील बंड थांबविण्यात वरिष्ठांना अपयश येत असल्याचे चित्र आज नंदुरबारमध्ये दिसून आले. भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुहास नटावदकर यांनी भाजप उमेदवार डॉ. हीना गावितांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 
नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार सुहास नटावदकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. दरम्यान, नटावदकर यांनी हीना गावित यांच्या नामनिर्देशन पत्रावर हरकत घेतली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या हरकती फेटाळल्याने निवडणूक निर्णय अधिकारी आणि इतरांविरोधात अपक्ष उमेदवार सुहास नटावदकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 
डॉ. हीना गावित यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात वापरण्यात आलेला स्टॅंम्प (मुद्रांक) हा शासन परिपत्रकाप्रमाणे खरेदी केला नसून, तो कुठून आला याबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. हीना गावितांनी दाखवलेल्या उत्पन्नाचे स्रोत देखील चुकीचे असून, त्यांच्यावर अवलंबित असलेल्या घटकांची उत्पन्नाबाबतही संशय या याचिकेत व्यक्त करण्यात आला आहे. सुहास नटावदकर यांच्या पत्नी सुहासिनी नटावदकर, ऍड. पी. आर. जोशी आणि ज्येष्ठ नेते कुवरसिंग वळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन या याचिकेबाबत माहिती दिली आहे. या याचिकेवर 16 एप्रिलला सुनावणी होणार असल्याने आता या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: marathi news nandurbar hina gavit court yachika