जनता कर्फ्युला नंदुरबार जिल्हावासीयांचा शंभर टक्के प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 March 2020

कुणीही बाहेर नाही, सर्व रस्ते निर्मनुष्य असे चित्र सकाळी दहावाजेपर्यंत कायम असल्याने प्रशासनाच्या आवाहनाला जनतेने जोरदार समर्थन केल्याचे  नंदुरबार जिल्हयातील चित्र  आहे

नंदुरबार : शहरासह जिल्ह्याभरात नागरिकांनी जनता कर्फ्युला उस्फुर्त प्रतिसाद देत कोरोनाचा संसर्ग टाळण्याची खबरदारी घेतल्याचे आज दिसून आले.
नंदुरबार, शहादा, नवापूर, तळोदा या प्रमुख शहरांसह मोलगी, धडगाव, अक्कलकुवा या ग्रामीण भागातही जनता घरातच असल्याचे दिसून आले. कुणीही बाहेर नाही, सर्व रस्ते निर्मनुष्य असे चित्र सकाळी दहावाजेपर्यंत कायम असल्याने प्रशासनाच्या आवाहनाला जनतेने जोरदार समर्थन केल्याचे  नंदुरबार जिल्हयातील चित्र  आहे.

नक्‍की वाचा - संसर्गाला रोखण्यासाठी जळगावरांचा "जनता कर्फ्यू' 

कोरोनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे. सकाळी 7 वाजेपासून शहरातील सर्वच रस्त्यांवर चिटपाखरूही नव्हते. शहरच काय पण ग्रामीण भागात देखील जनता कर्फ्यु स्वतःहून पाळला जात आहे, यावरून जनता कोरोनविषयी आता गंभीर झाल्याचे स्पष्ट होते.

सहा पथक तैनात 
नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी नंदुरबारला सहा पथके तैनात केली असून ते सर्व भागात फिरत आहेत, कुठेही नागरिक घराबाहेर असल्याचे दिसत नाही असे पोलीस निरीक्षक सुनील नंदवळकर यांनी सांगितले. मोलगीचे पोलीस निरीक्षक पगार यांनी आदिवासी भागातील एकही नागरिक फिरकला नसून शहरातही शांतता, शुकशुकाट असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड हे दर पंधरा मिनिटात आढावा घेत असून जनता उस्फुर्तपने सहभागी झाल्याचे सूत्रांनी सांगितले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar janta karfew hundred parcntage lock down