जि.प. निवडणूक : माघारीकडे साऱ्यांचे लक्ष 

जि.प. निवडणूक : माघारीकडे साऱ्यांचे लक्ष 

नंदुरबार ः जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उद्या (ता. ३०) उमेदवारी अर्जांचा माघारीचा दिवस आहे. त्यामुळे आता निवडणुकीतून कोण -कोण माघार घेतात. याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. कारण या निवडणुकीत कधी नव्हे एवढ्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्थात त्यात काही डमी, काही एकास तीन तर काही पक्षांनी अपेक्षाभंग केलेल्या उमेदवारांचा अर्जाचाही समावेश आहे. त्यामुळे अर्जाची संख्या बाराशेवर गेली आहे. त्यातून माघारीअंती किती उमेदवार रिंगणात राहतात. त्यावर पुढचे निवडणूक व उमेदवाराच्या निवडीची गोळा बेरीज ठरणार आहे. 

हेही पहा > सत्ताधारी भाजपला सदस्य फुटण्याची भीती
जिल्हा परिषदेच्या ५६ गट व पंचायत समितीच्या ११२ गणांसाठी निवडणूक सुरू आहे. यावेळेस प्रथमच इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे.जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यापासून कॉंग्रेस -राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातच सरळ लढत राहिली आहे. माकपवगळता इतर कोणीही जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उतरत नव्हते. मात्र यावर्षी भाजपने जिल्ह्यात पाळेमुळे रोवले आहेत. त्यामुळे भाजपने सर्व जागांवर उमेदवार देत जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. अर्थात राष्ट्रवादीची जागा भाजपने घेतली आहे. तर कॉंग्रेसची जागा शिवसेनेने घेतली आहे. एकेकाळचे मित्र पक्ष या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यांच्या जोडीला कॉंग्रेसनेही कंबर कसली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आपले अस्तित्व टिकविण्यासाठी निवडणुकीत काही उमेदवार दिले आहेत. त्यामुळे दोन पक्षांऐवजी आता कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेना व माकप असे पाच पक्ष या निवडणुकीचा रिंगणात आहेत. त्यांच्यासोबतच ज्यांना पक्षाने उमेदवारी नाही दिली. अशा दुः खी आत्म्यांनी पक्षाला न जुमानता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केली आहे. त्यामुळे यावळेस उमेदवारी अर्जाची संख्येने उच्चांक गाठला आहे. 

बंडखोर व अपक्षांना थोपवण्याचा प्रयत्न 
पाच पक्ष असले तरी माकप केवळ काही जागांवर रिंगणात आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसही काही ठरावीक जागा लढवीत आहे. मात्र भाजप व शिवसेना व कॉंग्रेस यांनी जवळपास सर्वच जागांवर उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात राष्ट्रवादी भाजपच्या मार्गदर्शनाखाली काही जागा लढवीत असल्याचे बोलले जात आहे. म्हणजे त्या जागांवर भाजपने उमेदवार दिले नाही. तर कॉंग्रसने नंदुरबार तालुक्यात काही ठिकाणी उमेदवार न देता शिवसेनेला पूरक वातावरण निर्माण केले आहे. तर शिवसेनेने धडगाव, अक्कलकुवा, तळोदा तालुक्यात जेथे कॉंग्रेसला पूरक वातावरण आहे. तेथे उमेदवार न देता अप्रत्यक्ष मदत केली आहे. त्यामुळे पक्षीय उमेदवारांचे गणित फिट असतांना बंडखोर व अपक्षांनी भरलेले अर्ज जर मागे न घेतल्यास ते पक्षीय उमेदवारांचे गणित बिघडवू शकतील. हे लक्षात घेऊन ज्यांना अपक्ष व बंडखोरांची भिती आहे. ते पक्ष व उमेदवार अपक्ष व बंडोबांना थंड करण्यासाठी पाहिजे ते प्रयत्न करतांना दिसत आहेत. त्यात काही पक्षांकडून त्यांची मनधरणी करून दुसऱ्या ठिकाणी पदे देण्याचे किंवा पुनवर्सन करण्याचे आश्‍वासन दिले जात आहे. त्यामुळे पक्षीय नेत्यांना कितपत ते जुमानतात व कितपत यश येते. हे उद्याचा माघारीअंतीच स्पष्ट होईल. 

प्रमुख लढती 
कोपर्ली गट- राम रघुवंशी शिवसेना, रवींद्र गिरासे भाजप. शनिमांडळ गट- रेखा तांबोळी राष्ट्रवादी कॉंग्रेस,स्मिता दिघे,सुनिता पाटील,सीमा पाटील - 
शिवसेना,भाजप- सुनंदा पाटील, रूचिका पाटील . रनाळे गट- संध्या पाटील , पुष्पा तांबोळी, कल्पना पाटील -भाजप,अरूणा पाटील, भारती शिंत्रे, मीना पाटील-शिवसेना , कोठली गट- कुमुदिनी विजयकुमार गावित -भाजप, निवेदिता मनोहर वळवी- कॉंग्रेस,आष्टे गट- दत्तू चौरे- शिवसेना, हेमराज कोकणी -भाजप, तळोदा तालुक्यात बुधावल गट- सुहास नाईक- कॉंग्रेस, गणेश चौधरी- भाजप, आकाश वळवी -शिवसेन ,अमोणी गट -सीमा वळवी - कॉग्रेस, मंगलाबाई वळवी- शिवसेना, सविता वसावे - भाजप. अक्कलकुवा तालुक्यात गंगापूर -नागेश पाडवी- भाजप, मोरांबा गट - रिना पाडवी- शिवसेना, शहादा तालुका- म्हसावद- अभिजित पाटील- कॉंग्रेस, भगवान पाटील-भाजप, पाडळदा - अभिजित पाटील-कॉंग्रेस, दीपक पाटील- माकप, धनराज पाटील -भाजप. लोणखेडा - जयश्री पाटील-भाजप, रेखा गांगुर्डे -कॉंग्रेस. कहाटूळ - निर्मला माळी -राष्ट्रवादी, प्रतिमा माळी -शिवसेना, शालिनी सनेर -कॉंग्रेस. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com