esakal | भीषण अपघात : कोंडाईबारी घाटात ट्रॅव्हल्स बस ४० फूट दरीत कोसळी, चार जण ठार तर ३५ जण जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

भीषण अपघात : कोंडाईबारी घाटात ट्रॅव्हल्स बस ४० फूट दरीत कोसळी, चार जण ठार तर ३५ जण जखमी

अपघात मध्यरात्री झाल्ल्याने तेथे एकच आक्रोश सुरू झाला होता .काहींनी ही माहिती पोलिसांना कळवली .माहिती मिळताच महामार्ग पोलिसांचे पथक तसेच विसरवाडी व नवापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोचले.

भीषण अपघात : कोंडाईबारी घाटात ट्रॅव्हल्स बस ४० फूट दरीत कोसळी, चार जण ठार तर ३५ जण जखमी

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : धुळे _सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटात खाजगी ट्रॅव्हल्स सुमारे चाळीस फूट दरीत कोसळून चार जण जागीच ठार झाले आहेत तर ३५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. ही माहिती मिळताच विसरवाडी व नवापूर पोलीस पथक घटनास्थळी पहाटेच पोचले .ही घटना उत्तर रात्री घडली आहे .जखमींवर विसरवाडी, नवापूर व नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृतांचे ओळख पटवण्याचे काम पोलिस यंत्रणा करीत आहे.

जळगाव हुन सुरतकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची बस प्रवासी घेऊन सुरतकडे निघाली होती. मध्यरात्रीच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस कोंडाईबारी घाटात आल्यानंतर दर्ग्या जवळील घाटात असलेल्या सुमारे चाळीस फूट दरीत ती कोसळली .हा अपघात कसा झाला. याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती पुढे आलेली नाही .मात्र या अपघातात चार जण ठार झाले असून ३५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. अपघात मध्यरात्री झाल्ल्याने तेथे एकच आक्रोश सुरू झाला होता .काहींनी ही माहिती पोलिसांना कळवली .माहिती मिळताच महामार्ग पोलिसांचे पथक तसेच विसरवाडी व नवापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोचले. त्यांनी मदत कार्य करून चार जणांचा मृत्देह देत ताब्यात घेतला. तर जखमींना विसरवाडी ,नवापूर नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे .अपघात अत्यंत भीषण असून याच्यात गंभीर जखमींची संख्या जास्त आहे .त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे .मृत् ४ व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नाही .पोलीस त्यांची ओळख पटवण्याचे काम करीत आहेत.

संपादन- भूषण श्रीखंडे नंदूरबार