esakal | कुपोषित बालकांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम
sakal

बोलून बातमी शोधा

कुपोषित बालकांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम

कुपोषित बालकांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : मातृत्व अनुदान (Grants) लाभार्थ्यांना वेळेवर वितरित करावेत. शासनाच्या (government) कोणत्याही योजनेत खंड पडणार नाही, याची दक्षता घ्यावी. कुपोषित बालकांचा (malnourished children) शोध घेण्यासाठी एक महिन्याची विशेष मोहीम ( Special Campaign) राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड (Collector Dr. Rajendra Bharud) यांनी दिल्या. (malnourished children search special campaign collector dr Rajendra Bharud order)

हेही वाचा: खडसेंना धक्का..भाजपचे पण खडसेसमर्थक ६ नगरसेवक सेनेत !


जिल्हास्तरीय मॉन्सून- २०२१ पूर्व तयारीबाबत गाभा आणि नवसंजीवनी योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, जिल्हा नियोजन अधिकारी
(मानव विकास) विजय शिंदे उपस्थित होते.


डॉ. भारूड म्हणाले, की सिकलसेलचे किट धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात वितरित करावे. स्वयंसेवी संस्थांनी ग्रामीण भागातील लसीकरण वाढविण्यासाठी जनजागृती उपक्रम राबवावे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत पोषण आहाराचे वितरण करावे. पूर्ण झालेल्या अंगणवाड्या पावसाळ्यापूर्वी ताब्यात घ्याव्यात. अंगणवाडीत पाण्याची व्यवस्था करावी. अपूर्ण अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाला गती द्यावी.

हेही वाचा: आणि 'ती'..म्हणाली, साहेब तुमचं कल्याण होवो !


बिलाडी, डामरखेडा लसीकरण शिबिरास भेट
शहादा : तालुक्यातील बिलाडी व डामरखेडा येथील लसीकरण शिबिरास जिल्हाधिकारी डॉ. भारूड, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी भेट दिली. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अभिजित पाटील, सामाजिक कार्यकर्त्या हेमलता शितोळे, उपविभागीय अधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र वळवी, सरपंच, स्थानिक लोकप्रतिनिधी, तसेच स्थानिक शिक्षण विभागाचे व आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी उपस्थित होते.