शहादा-धडगाव रस्त्यावरील अपघातात पाच ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

शहादा - धडगाव रस्त्यावर आमोदा गावाजवळ आज सकाळी मजूर घेऊन जाणारे अॅपेरिक्शा (एम.एच ३९ डी ८९५) व धान्य वाहतूक करणारे ट्रक(एम एच १८ ए ७४७३) यांत भिषण अपघात झाला. या अपघातात ५ जण जागिच मयत झाले. तर ११ जण गंभिर जखमी झाले आहे.

नंदुरबार : जिल्ह्यातील शहादा-धडगाव रस्त्यावर आमोदा गावाजवळ आज सकाळी ६.३० ते ७.०० वाजेच्या सुमारास अॅपेरिक्शा आणि टृकच्या अपघातात पाच जण जागीच ठार झाले.

शहादा - धडगाव रस्त्यावर आमोदा गावाजवळ आज सकाळी मजूर घेऊन जाणारे अॅपेरिक्शा (एम.एच ३९ डी ८९५) व धान्य वाहतूक करणारे ट्रक(एम एच १८ ए ७४७३) यांत भिषण अपघात झाला. या अपघातात ५ जण जागिच मयत झाले. तर ११ जण गंभिर जखमी झाले आहे. जखमिंवर म्हसावद ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढिल उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मयत झालेल्यामध्ये संजय रायमल रावताळे(वय ३२,रा. लक्कडकोट), गोरख ईंदास पावरा (वय४०), रोहिदास कमा पावरा (६५), गुलाब फकिरा पावरा(६०), शिकार्या पाच्या रावताडे(६५, सर्व रा. तलावडी ता.शहादा जि. नंदुरबार). म्हसावद पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Marathi news Nandurbar news 5 dead in accident

टॅग्स