कॉपी देण्यापासून रोखणाऱ्या पोलिसाला चौघांची मारहाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

नंदुरबार - दहावीच्या पेपरला बाहेरून कॉपी पुरवणाऱ्यास मज्जाव करणाऱ्या पोलिसावर आज चौघांनी हल्ला चढवत मारहाण केली. आज दुपारी हा प्रकार घडला. याबाबत शहर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. परीक्षाकाळात पोलिसांना मारहाणीचा जिल्ह्यात हा दुसरा प्रकार आहे.

दहावीचा आज विज्ञान-तंत्रज्ञान एकचा 40 गुणांचा पेपर होता. अकरा ते एक अशी परीक्षेची वेळ होती. डी. आर. विद्यालयात बाहेरून कॉपी देणाऱ्या एका युवकाला बंदोबस्तासाठी असलेले पोलिस कर्मचारी पोलाद भिल यांनी पकडले व त्याच्याकडील कॉपी हिसकावली. त्यामुळे भिल यांच्यावर त्याने व त्याच्या तिघा साथीदारांनी अचानक हल्ला चढवत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. पोलिस गणवेशाची छेडछाड केली.

याबाबत संबंधितांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीनंतर हे टोळके पळून गेले. मात्र, त्यांची मोटारसायकल पल्सर (एमएच39 एस. 6930) पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दरम्यान, यंदा परीक्षाकाळात बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांशी हुज्जत घालणे, आमिष दाखवणे, धक्काबुक्की करणे असा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहेत.

Web Title: marathi news nandurbar news police beating crime