नंदुरबार येथे साडे चौतीस लाखाचा गुटखा जप्त 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून खबरदारीच्या सर्व उपाययोजना राज्य शासन युध्द् पातळीवर राबवीत आहे.त्यासोबतच देश लॉकडाऊन करण्यात आला आहे.

नंदुरबार : वाळूचा डंपरमध्ये गुटक्याची वाहतूक करतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चार जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शहरातील निझर रस्त्यावर करण्यात आज दुपारी दीडला करण्यात आली. त्यांचाकडून ३४ लाख ६७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून खबरदारीच्या सर्व उपाययोजना राज्य शासन युध्द् पातळीवर राबवीत आहे.त्यासोबतच देश लॉकडाऊन करण्यात आला आहे.त्याचा फायदा घेत महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटका गुजरात राज्यातून नंदुरबार जिल्ह्यात आणून चोरटी वाहतूक करुन त्याची जास्त दरात करणाऱ्यांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आहेत.आज गुजरात राज्यातुन निझर मार्गे नंदुरबार येथे मोठया प्रमाणात विमल गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी 
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांचा मार्गदर्शनाखाली काल (ता.१५) रात्री ११ पासुन निझर रोडवर मन्सुरी टेन्ट हाऊसजवळ सापळा लावला.रात्री दीडचा सुमारास निझरकडुन एक हायवा डंपर भरधाव वेगाने आले. पथकातील कर्मचाऱ्यांनी बॅटरीच्या सहाय्याने वाहन उभे करण्याचा इशारा दिला असता संशयित वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघून गेला.पोलिसांना संशय आल्याने वाहनाचा पाठलाग करुन शिताफीने वाहन थांबविले.डंपरमध्ये चालक व सोबत ३ जण होते.त्यांना नांव गांव विचारले असता त्यांनी नावे सांगितले. त्यांना ताब्यात घेवुन वाहनाची तपासणी केली असता. त्यात पांढऱ्या व खाकी रंगाचे पोत्यांमध्ये विमल गुटका मिळून आला. हा गुटखा व डंपर नरेंद्रसिंग राजपूत यांचा असुन निझर येथून होलाराम सिंधी यांच्या गोडावून मधून भरुन आणला आहे. तो कुठे उतरवायचा याबाबत डंपर मालक नरेंद्रसिंग राजपूत सांगणार होता. त्यावेळेस नरेंद्र राजपूत हा ब्रेजा चारचाकी वाहन (क्र ७१००) ने डंपरच्यापुढे चालत असल्याचे सांगितले. 
ताब्यात घेण्यात आलेल्या डंपरमध्ये ७ लाख ५३ हजार रुपये किमतीचा विमल पान मसाला गुटक्याचे ३० पोते ,१ लाख ८८ हजार ४०० रुपयाचे तंबाखूचे ६ पोते , २५ लाख रुपये किमतीचा हायवा डंपर, २५ हजार रुपये किमतीचा इतर मुद्देमाल असा एकुण ३४ लाख ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन आकेश काशिनाथ नाईक (वय-२४), मनिष गणेश ठाकरे (वय-२०), नरेश विनोद पाडवी , राहुल भिका पाडवी (वय-१९ सर्व रा. नळवा बु. ता.जि. नंदुरबार) व डंपर मालक नरेंद्र राजपुत व होलाराम सिंधी यांचे विरुध्द् उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन चौघांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar police gutkha mafiya Action