पाऊस - विजांचा अचूक अंदाजासाठी, दामिनी ॲप, विकसित 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 June 2020

राज्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटांसह पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावतो. मान्सून दाखल झाल्यावर साधारणतः पहिल्या पावसात शहरी भागाबरोबरच विशेष करुन ग्रामीण भागात वीज कोसळून अनेक निरपराध शेतकरी व नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. नुकतेच २५ जूनला बिहारमध्ये वीज पडून तब्बल ८३ तर उत्तर प्रदेशमध्ये २३ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

तळोदा : पूर्वमोसमी पाऊस व साधारणतः मान्सूनचा पहिल्या पावसात अनेकदा वीज पडून निरपराध शेतकरी व नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटाचा अचूक अंदाज नागरिकांना मिळावे, यासाठी 'दामिनी' अँप विकसित केले आहे. या अँपच्या माध्यमातून वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटाचे अचूक अंदाज अर्धा ते एक तास आधी नागरिकांना घरबसल्या मिळणार आहेत. त्यामुळे वादळी वाऱ्यांसह येणारा पाऊस आणि वीज पडल्यामुळे होणारी निरपराध नागरिकांची जीवितहानी टाळणे शक्य होणार आहे. 

राज्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटांसह पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावतो. मान्सून दाखल झाल्यावर साधारणतः पहिल्या पावसात शहरी भागाबरोबरच विशेष करुन ग्रामीण भागात वीज कोसळून अनेक निरपराध शेतकरी व नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. नुकतेच २५ जूनला बिहारमध्ये वीज पडून तब्बल ८३ तर उत्तर प्रदेशमध्ये २३ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. विजांसह होणाऱ्या पावसाचे पूर्वानुमान शेतकऱ्यांना व नागरिकांना काही तास अगोदर समजावे, यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने 'दामिनी' हे स्वतंत्र मोबाइल अँप विकसित करुन त्याचा वापरासाठी नागरिकांना सूचित केले आहे. पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामान संशोधन संस्था ( आयआयटीएम ) या संस्थेने हे अँप विकसित केले आहे. 'दामिनी' अँपसाठी आयआयटीएमने लाइटनिंग लोकेशन नेटवर्क हे मॉडेल विकसित केले आहे. माहिती संकलनासाठी विविध भागात सेन्सर बसविण्यात आले आहेत. या अँपमुळे शेतकरी, नागरिकांना वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटाचे अर्धा ते एक तास आधी अचूक अंदाज मिळू शकतो. तसेच वीज म्हणजे नेमके काय, वीज कोसळणे याची शास्त्रीय माहिती आणि विजेपासून वाचण्यासाठी नागरिकांनी काय करायला पाहिजे, याचीही सविस्तर सचित्र माहिती 'दामिनी' अँपमध्ये देण्यात आली आहे. या अँपवर लोकेशन टाकल्यानंतर संबंधित भागात वादळी वारे अथवा विजेच्या गडगडांची शक्यता असल्यास ती माहिती बघायला मिळत असते, त्यामुळे या माहितीचा आधारावर शेतकरी व नागरिक वेळीच सावध होऊन त्यांच्या जीव वाचवू शकतात. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी हे अँप डाऊनलोड करुन त्याचा वापर करावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar rain and vij damini mobile aap devlope