मुसळधार ः रायखेडला भिंत पडून महिलेचा मृत्यू; युवक गंभीर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

शहादा ः दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यात रायखेड (ता. शहादा) येथे सकाळी सातच्या सुमारास मुसळधार पावसामुळे मातीच्या घराची भिंत पडल्याने या ढिगाऱ्याखाली दबून महिला जागीच ठार झाली. तर युवक गंभीर आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आज देखील सकाळपासून पावसाची संततधार सुरू असून जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले आहे. पावसामुळे शहादा- शिरपुर रस्ता तूर्त बंद करण्यात आला आहे. यातच शहादा शहर, वैजाली, डामरखेडा आवगे, जूनवने या गावांसह 5 ते 6 गावातील साधारण 150 ते 200 कुटूंब सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहेत 
नंदुरबार तालुक्‍यात आतापर्यंत 124 घरांची पडझड झाली असल्याचे प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. तर मौजे आष्टे येथी 10 कुटुंबाना समाजमंदीरात स्थलांतरीत करण्यात आले आहे. मौजे खामगावकडे जाणाऱ्या पुलाचा अर्धा भाग पडल्यामुळे यावरील वाहतूक बंद झाली आहे. तसेच मौजे गंगापुर येथील तलाव पुर्ण भरल्यामुळे सांडवा खोल करुन पाणी कमी करण्यात आले आहे. बंधारे, तलाव भरल्याने लघुसिंचन, कृषी, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar shahada heavy rain house one woman death