शहाद्यात पुन्हा एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 April 2020

शहाद्यातील रूग्णांची संख्या आता तीन झाली.हा युवक मृत युवकाचा संपर्कात आला होता.अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली आहे. 

नंदुरबार  : शहादा येथे पुन्हा २३ वर्षीय युवकाचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा प्राप्त झाला आहे. हा युवक पूर्वीचा रूग्णांचा प्रतिबंधात्मक झोन मधीलच आहे. त्यामुळे शहाद्यात एकत खलबळ उडाली आहे. शहाद्यातील रूग्णांची संख्या आता तीन झाली.हा युवक मृत युवकाचा संपर्कात आला होता.अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली आहे. 

नक्‍की पहा - साक्रीत 30 एप्रिलपर्यंत सर्व व्यवहार बंद 

शहादा येथील वार्ड क्रमांक सातमधील ३२ वर्षीय युवक कोरोनाचा बळी ठरला. त्याचे काल निधन झाले. त्याचा संपर्कातील नागरीकांचा तपास लावून त्यांची तत्काळ स्वॅब नमुने घेऊन तपासणी करण्यात येत आहेत.काल स्वॅब घेतलेल्या नागरिकांचा अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाले.त्यात मृत युवकाचा संपर्कातील २३ वर्षीय युवकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तो युवक शहाद्यातील प्रतिंबधात्मक झोनमधीलच रहिवाशी आहे.

क्‍लिक करा - जळगाव ब्रेकिंग : पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह, रेडझोनकडे वाटचाल

युवकाचा संपर्कातील अजून काही जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. मृत युवकासह शहाद्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता तीन झाली आहे. प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी त्यांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱी डॉ. भारूड यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar shahada one corona positive cose