साक्रीत 30 एप्रिलपर्यंत सर्व व्यवहार बंद 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 April 2020

शहरात आणखी एका कोरोना रुग्ण आढळून आल्याचे कळताच प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी साक्रीत तालुका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तहसील कार्यालयात बैठक झाली, त्यात हे निर्णय घेण्यात आले. 

साक्री : शहरात आज कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळून आल्यानंतर हादरलेल्या प्रशासनाकडून आता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. याअनुषंगाने आजपासून 30 एप्रिलच्या पहाटे पाचपर्यंत शहरातील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. या कालावधीत साक्री व भाडणे येथील स्टेट बॅंक शाखावगळता अन्य बॅंका बंद राहणार आहे. आजपासून तीन दिवस शहरातील मेडिकल दुकानेही बंद राहणार आहेत. परिसर निर्जंतुकीकरण करणे, सील करणे आदी उपाययोजना सुरू आहेत. 

क्‍लिक करा - त्या निष्पाप दोन्ही चिमुकल्यांना नडले दारिद्रय...तरीही आई म्हणते माझा पती असा नाही हो... 

शहरात आतापर्यंत कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. यात यापूर्वी 10 एप्रिलला प्रौढाचा "कोरोना'मुळे मृत्यू झाला होता, तर आज 57 वर्षीय महिलाही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. अशा परिस्थिती हा कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू नये, यासाठी प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शहरात आणखी एका कोरोना रुग्ण आढळून आल्याचे कळताच प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी साक्रीत तालुका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तहसील कार्यालयात बैठक झाली, त्यात हे निर्णय घेण्यात आले. 

नक्‍की पहा - माजी मंत्र्यांच्या जामनेरात २२ हजार केशरी कार्डधारकांना धान्याची प्रतीक्षा 

शहरात यापूर्वीच कोरोनाचा रुग्ण आढल्यानंतर तो रुग्ण राहत असलेल्या परिसरापासून आजूबाजूचे तीन किलोमीटर क्षेत्र हे कंटेन्मेंट क्षेत्र, तर त्यापुढील पाच किलोमीटर क्षेत्र हे बफर क्षेत्र म्हणून घोषित केले होते. आता आढळून आलेला रुग्णही त्या परिसरालगतचा असल्याने हे प्रतिबंधित क्षेत्र कायम राहणार आहे. आजपासून 30 एप्रिलच्या पहाटे पाचपर्यंत या कंटेन्मेंट क्षेत्रात पूर्णपणे संचारबंदी लागू राहणार आहे. भाजीपाला, फळे, दूध, किराणा दुकानेही बंद राहणार आहेत. तसेच आजपासून तीन दिवस मेडिकलही बंदच राहणार आहेत. यामुळे कुणालाही कुठल्याही कारणांसाठी घराबाहेर पडता येणार नाही. 

बेफिकिरांचा मुक्तसंचार सुरूच 
शहरात आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याची माहिती सकाळी नऊच्या सुमारासच येऊन धडकली. असे असतानाही शहरात अकरापर्यंत अनेक बेफिकिरांचा मुक्तसंचार दिसून येत होता. भाजीपाला विक्रेत्यांकडे, किराणा दुकानांच्या बाहेर रांगाच्या रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. सुरवातीला पोलिसांकडून आवाहन करत घरी जाण्यास सांगण्यात आले, मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस पोलिस प्रशासनाकडून प्रसाद देण्यास सुरवात झाल्यानंतरच ही गर्दी कमी झाली. गंभीर बाब म्हणजे आज जी महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली, त्या महिलेच्या घरापासून अवघ्या काही मीटरवरील बॅंकांच्या बाहेर सकाळी अकरापर्यंत गर्दी कायम होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule sakri corona virus all market closed 30 april