एकजुटीच्या बळावर तरुणांनी श्रमदानातून साकारला वनराई बंधारा 

धनराज माळी
Wednesday, 28 October 2020

पाणी साठवून लोकांना अधिक फायदा व्हावा यासाठी विविध उपायोजना बरोबरच शेतीसाठी वनराई बंधारा साकारण्याच्या कामात त्यांनी लक्ष घातले.

धडगाव ः लॉकडाउन काळात रिकाम्या वेळात तरुणांच्या विशेष लक्षामुळे उमराणी बुद्रुक गाव आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहे. यात प्रामुख्याने रस्ता दुरुस्ती, शिक्षण, रेशन दुकान, वृक्षारोपण, ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये तरुणांनी लक्ष घातले. एकत्र येऊन व योगदान देऊन एकजुटीचे बळ काय असते, ते दाखवून देत आहे. असच त्यांनी एकत्र येत उमराणी येथे श्रमदानातून वनराई बंधारा साकारला आहे.  

आवश्य वाचा- कृषी विधेयक विरोध ट्रॅक्टर रॅलीसाठी राहुल गांधींना आमंत्रण
 

कृषिसेवकांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी ‘पाणी आडवा- पाणी जिरवा’ या उपक्रमाची सुरवात तरुणांनी केली. पाणी साठवून लोकांना अधिक फायदा व्हावा यासाठी विविध उपायोजना बरोबरच शेतीसाठी वनराई बंधारा साकारण्याच्या कामात त्यांनी लक्ष घातले. आणि उमराणी येथे पहिला वनराई बंधारा त्यांनी तयार केला.

अजून चार बंधारे तयार करणार

पर्यावरण संवर्धन तसेच भुजलपातळी चांगली राहावी यासाठी तरुण विविध उपायोजना कृषीेसेवकाच्या मार्गदर्शन खाली काही दिवसांतच अजून चार वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प तरुणांनी केला आहे. 

उपक्रमात यांचा होता सहभाग

या उपक्रमात वामन पावरा, प्रा. बटेसिंग पावरा, इंजिनिअर विशाल पावरा, चेतन पावरा, संतोष पावरा, विबीशन पावरा, ब्रिजलाल पावरा, राजेंद्र पावरा, दिलीप पावरा, राजू साळवे, किसन पावरा, हर्षल पावरा, संजय पावरा, सुरेश पावरा, सायसिंग पावरा, पिंटू पावरा, अनिल पावरा, जयवंत पावरा, सुनील पावरा, इंजिनिअर राजेंद्र पावरा, अतुल पावरा, जयवंत, सुकलाल पावरा, सायका पावरा, नितीन पावरा, पिंटा पावरा, ज्ञानेश्वर पावरा, उदयसिंग पावरा, रतिलाल पावरा आदी उपस्‍थित होते. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar strength of unity, the youth built the Vanrai Dam through hard work