आमदार उदेसिंग पाडवी कॉंग्रेसच्या वाटेवर? 

आमदार उदेसिंग पाडवी कॉंग्रेसच्या वाटेवर? 

खडसे यांचे कट्टर समर्थक असल्यामुळेच माझे तिकीट कापले गेले; तसेच एकनाथराव खडसे यांचे देखील तिकीट कापले जाण्याची दाट शक्‍यता असल्याचे वर्तविले जात आहे. त्यामुळेच आमदार उदेसिंग पाडवी हे कॉंग्रेसच्या वाटेवर असून तसा संदेश देखील आमदार पाडवी यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. ते कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याचे देखील बोलले जात आहे. 

नंदुरबार येथील चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवबंधन मानल्यामुळे भाजपचे डॉ. विजयकुमार गावित यांच्या समोर उमेदवार कोण? हा प्रश्न अजूनदेखील कॉंग्रेसला सोडविता आला नसल्याने या जागेवर उदेसिंग पाडवी हे विधानसभेची निवडणूक लढणार की काय अशी देखील शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. उदेसिंग पाडवी शहादा मतदार संघांमधून भाजपकडून गेल्या पंचवार्षिकला निवडणूक लढले होते. त्यांनी कॉंग्रेसचे माजी क्रीडा मंत्री पद्माकर वळवी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेंद्र पाडवी यांच्या पराभव केला होता. मात्र माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातून स्वतः देखील राजीनामा देणार असल्याची उघड भूमिका घेत त्यांनी खडसे यांची बाजू उचलून धरली होती. उत्तर महाराष्ट्रात भाजपाचे दोन गट उघड असून एकनाथराव खडसे यांचे निकटवर्तीय व त्या गटाचे असल्यानेच हे तिकीट कापले गेल्याच्या अप्रत्यक्ष आरोप उदेसिंग पाडवी यांच्याकडून केला जात आहे. तर नंदुरबार जिल्ह्यामधील घडामोडी तासातासाला बदलत असून चंद्रकांत रघुवंशी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील कॉंग्रेसचे उमेदवार व कार्यकर्ते गलितगात्र झाले आहे. आपल्यावर अन्याय झाला पक्षाने डावलले अशी भावना उदेसिंग पाडवी यांची झाली असल्याने आता ते नंदुरबार विधानसभा क्षेत्रातून माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या विरोधात निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. तसेच कॉंग्रेसचे रिक्त असणारे जिल्हाध्यक्ष पद कोणाला द्यायचे या संदर्भात देखील त्यांचे नाव आता अग्रभागी येत आहे. कॉंग्रेसच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी बोलणी करायला सुरुवात केली असून प्राथमिक चर्चा आज होणार असल्याचे समजते. दरम्यान उदेसिंग पाडवी यांनी केलेल्या बंडामुळे नंदुरबार जिल्ह्यात शहादा- तळोदा विधानसभा क्षेत्र व नंदुरबार विधानसभा क्षेत्रावर काय परिणाम होतात याकडे देखील जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. आता ते कॉंग्रेसच्या संघटन पातळीवर राहून शहादा मतदार संघात विरोधात राहतात की नंदुरबार विधानसभा निवडणूक लढवितात; याकडे लक्ष लागून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com