
तुलशीविवाहाने पुन्हा एकदा लग्नसराईला प्रारंभ होत असल्याने यंदा कर्तव्य आहे म्हणत इच्छुक उपकर आणि त्यांचे पालक तयारीला लागले आहे.
बामखेडा ः दिवाळीनंतर तुळशी विवाहाला प्रारंभ होणाऱ्या लग्नसराईत यंदा गुरुवार २६ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला असून लग्नासाठी यंदा ४६ मुहूर्त आहेत मात्र जानेवारी ते मार्च दरम्यान गुरू व शुक्राचा अस्त असल्याने या काळात विवाहांना ब्रेक लागणार आहे दरम्यान शुभघटिका समीप आल्याने उपवरांसह पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मे महिन्यात सर्वांत जास्त १५ मुहूर्त आहेत.
आवश्य वाचा- सरपंच पदासाठी आता कोण..आरक्षणाची तयारी
लग्न म्हणजे दोन जीवांच्या मेळ, तसेच दोन कुटुंबांचे एकमेकांशी जोडले जाणारे घट्ट नाते. हिंदू संस्कृतीत दरवर्षी तुलशीविवाहानंतर लग्न समारंभांना प्रारंभ होतो. डिसेंबरमध्ये लग्नाच्या सहा तारखा आहेत. तर मे महिन्यात लग्नासाठी सर्वाधिक १५ मुहूर्त आहेत दरम्यान जानेवारीत १७ तारखेपासून गुरूचा अस्त सुरू होत असून तो १५ फेब्रुवारीपर्यंत असेल त्यानंतर लगेच शुक्राचा अस्त लागत असून तो मार्च अखेरपर्यंत असणार आहे. या अस्तात लग्नाचा मुहूर्त नसल्याने जानेवारी ते मार्च असे तीन महिने विवाहांना ब्रेक लागेल
चालू वर्षी मार्चपासून कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे त्यामुळे लग्नसराईला कोरोनाचा अडथळा निर्माण झाला परिणामी काही जोडपे मोजक्या नातेवाइकांच्या साक्षीने लग्नाच्या बेडीत अडकली, तर काही जणांनी विवाहांच्या तारखा पुढे ढकलल्या होत्या परंतु तुलशीविवाहाने पुन्हा एकदा लग्नसराईला प्रारंभ होत असल्याने यंदा कर्तव्य आहे म्हणत इच्छुक उपकर आणि त्यांचे पालक तयारीला लागले आहे.
वाचा- धुळ्यात थंडीचा कडाका; २३ दिवसांनी परतली लाट
सोयीच्या मुहूर्ताकडे कल कोरोनामुळे सर्वच जीवनमान बदलले आहे त्यामुळे आता विवाहासाठी मुहूर्त काढण्याच्या पद्धती देखील बदल झाले आहे. जानेवारी ते मार्च गुरू व शुक्राच्या अस्तामुळे लग्नासाठी मुहूर्त नाही. तरी वधू वरांच्या पालकांकडून या तीन महिन्यात सोयीचा मुहूर्त काढण्यावर भर दिला जात असल्याची माहिती सुनील खुटे यांनी दिले आहे
विवाह तारखा अशा
डिसेंबर, ६, ७, ९, १०, ११. एप्रिल २५, २६, २७, २८,३०. में २ , ४, ७, ८, ९, १३, १४, २१, २२, २३, २४, २६, २९, ३०, ३१. जून ५, ६, १७, १९, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०.
जुलै १, २, ३, ७, १५, १८.
संपादन- भूषण श्रीखंडे