esakal | नंदुरबार : प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्‍या पदभाराबाबत पेटला वाद
sakal

बोलून बातमी शोधा

nandurbar zp

प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्‍या पदभाराबाबत पेटला वाद

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नंदुरबार : येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा (Nandurbar zilha prishad) पदभार माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम यांच्याकडे सोपविण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी पत्राद्वारे दिले आहे. तरीही त्या आदेशाला केराची टोपली दाखवत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (Nandurbar zilha prishad education department) वादग्रस्त गट शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांच्याकडे सोपविला आहे. या मागील गौडबंगाल काय, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. चार महिन्यापूर्वी वादातून काढलेला पदभार पुन्हा त्यांनाच सोपविल्याचे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. (nandurbar-zilha-parishad-post-of-primary-education-officer-issue)

हेही वाचा: साडेतीन वर्षे हिंदुत्वावरच जोर देणार : संजय राऊत

नंदुरबार जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभाग नेहमीच वादग्रस्त राहिले आहे. डॉ. राहुल चौधरी यांनी धुळे - नंदुबार जिल्ह्यात सर्वाधिक सेवा केली आहे. त्या काळात ते नेहमी वादग्रस्त ठरले. चार महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत समाज कल्याण सभापती यांनी त्यांना सभेतून बाहेर काढले होते. त्यांच्‍याकडून पदभार काढण्याची त्यांनी मागणी केली होती. त्यानुसार त्यांचा पदभार काढून वादावर पडदा पडला होता. त्यानंतर डायटच्या अधिव्याख्याता डॉ. वनमाला पवार यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता. त्यांनी जेमतेम एक महिना काम सांभाळले.

हेही वाचा: मुलांमध्ये कोरोनाची सौम्य असतील लक्षणे; भीती नको, काळजी घ्या

शिक्षण आयुक्‍तांचे सीईओंना पत्र

दरम्‍यान, ५ मेस शिक्षण आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले. डॉ. पवार यांच्याकडून पदभार काढून तो माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम यांच्याकडे सोपविण्याचे आदेश दिले. असे असताना पुन्हा अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये मनोमीलन करून शिक्षण आयुक्तांच्‍या आदेशाला केराची टोपली दाखवत पुन्हा प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांचा पदभार डॉ. राहुल चौधरी यांच्याकडे देण्यात आला आहे. या प्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्याने नुकतीच शिक्षण आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

पदभार न काढल्यास उपोषण..

दरम्यान, नवापूर येथील दर्शन सुरेश ढोले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावंडे यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी वादग्रस्त शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांचा पदभार न काढल्यास २० जूनपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.