esakal | खरेदीपूर्वीच मलिदा लाटणाऱ्या आरोग्य विभागाचे पितळ उघड
sakal

बोलून बातमी शोधा

Health materials

खरेदीपूर्वीच मलिदा लाटणाऱ्या आरोग्य विभागाचे पितळ उघड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


नंदुरबार : कोविड-१९ (Covid-19) च्‍या परिस्थितीचा गैरफायदा घेत जिल्हा परिषदेच्या (Nandurbar Zilla Parishad) आरोग्य विभागाने (Department of Health) विविध साहित्यसामग्री खरेदी प्रक्रियेत मोठा घोळ (Scam) करून ठेवल्याने संबंधित अधिकारी आणि पुरवठादाराच्‍या मिलीजुलीची साखळी उघड झाली आहे. प्रकरण अंगलट येऊ नये, म्हणून विविध कारणे दाखवून प्रकरण दाबण्याचा व संबंधित विभागातील दोषींना पाठीशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. साहित्य खरेदीपूर्वीच वित्त विभागाने पुरवठादार एजन्सीला लाखोचे बिल अदा करून मलिदा लाटण्याचा प्रयत्न उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: नंदुरबार जिल्ह्यात मातृवंदना योजनेंतर्गत ३३ हजार महिलांना लाभ


मार्च २०२१ मध्ये सरकारी रुग्णालयात लागणाऱ्या ट्रॉल्या पुरविण्याचे टेंडर एका एजन्सीला देण्यात आले होते. तथापि, साहित्यसामग्री पुरवठा झालेला नसताना वित्त विभागाने ३१ मार्च २०२१ला २० लाखांहून अधिकचा धनादेश या एजन्सीला दिल्याचा प्रताप केला आहे. शासनाने दिलेले अनुदान अखर्चित राहू नये, म्हणून आरोग्य विभागाने निविदा काढून घाईघाईने पुरवठादार एजन्सीला धनादेश देण्याची गफलत करून ठेवली आहे. सहा महिने उलटूनदेखील साहित्यसामग्रीचा पुरवठा न झाल्याने जिल्हा परिषद प्रशासनाच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याची तक्रार झाल्याने संबंधित एजन्सीला साहित्य पुरवठा करण्याच्या कडक सूचना देऊन ३१ ऑगस्टला दोन आयशर भरून साहित्यसामग्री जिल्हा रुग्णालयात असलेल्या गुदामात दाखल झाल्या. मात्र वेळेवर साहित्य पुरवठा न करणाऱ्या एजन्सीला काळ्या यादीत टाकणे किंवा पेनल्टी वसूल करणे असे नियम आहेत; परंतु जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी त्या एजन्सीला वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. याची सखोल चौकशी करण्याची मागणी जनमानसातून केली जात आहे.

हेही वाचा: कळंबबारी घाटात सागवान लाकडाची तस्करी रोखली


आरोग्य अधिकाऱ्यांनी टाळली भेट
साहित्या खेरदी प्रकरणी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. नितीन बोडखे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेल्यावर त्यांनी पाच मिनिटे थांबा सांगून पत्रकारांना न भेटताच एका बैठकीस निघून गेले. साधारण दोन तास त्यांच्याशी संपर्काचा प्रयत्न केला मात्र त्यांनी भेट टाळली.

loading image
go to top