esakal | कळंबबारी घाटात सागवान लाकडाची तस्करी रोखली
sakal

बोलून बातमी शोधा

कळंबबारी घाटात सागवान लाकडाची तस्करी रोखली

कळंबबारी घाटात सागवान लाकडाची तस्करी रोखली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपळनेर: येथील वन विभागाच्या पथकाने (Forest Department Squad) कळंबबारी (ता. साक्री) घाटात सापळा रचत सागवान लाकडाची तस्करी (Teak wood smuggling)रोखली. अंधाराचा फायदा घेत दुचाकी सोडून संशयित फरारी झाले. दुचाकीसह ८५ हजारांचा सागाचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा: धुळ्याचा महापौर ओबीसीच;सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

पिंपळनेर येथील वनाधिकारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शासकीय वाहनाने प्रोसेसिंग करताना मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास पिंपळनेर वन विभागाचे वनाधिकारी अरुण माळके, वनपाल एम. एन. बच्छाव, वनरक्षक सागर सूर्यवंशी, काळू पवार, सुमीत कुवर, गुलाब बहिरम, गार्ड चव्हाण, वाहनचालक विक्रम आहिरे, श्री. माळी आदी पिंपळनेर नवापूर रस्त्यावर गस्त घालत होते. त्या दरम्यान प्राप्त गुप्त माहितीवरून साडेतीनला पथकाने कळंबबारी (ता. साक्री) घाटात सापळा रचला.

हेही वाचा: गाय, म्हशीच्या दूध खरेदीदरात वाढ; जळगाव जिल्हा दूध संघाचा निर्णय

अंधाराचा फायदा घेत पसार

यावेळी दोन दुचाकीवरून सागाच्या चौकट घेऊन तस्कर पिंपळनेरकडे येताना दिसले. पथकाने त्यांना आवाज देऊन रस्त्यावर अटकाव करत असताना दोघे दुचाकीस्वार दुचाकी व सागवानी लाकूड सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाले. वन विभागाने सागवानी चौकटीचे आठ नग व दोन जुने दुचाकी जप्त केल्या. सागवानी चौकट अंदाजे किंमत २५ हजार रुपये व दोन जुने दुचाकी अंदाजे किंमत ६० हजार रुपये, असा एकूण ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पंचनामा करत पिंपळनेर वन विभागाकडून जप्त करून पिंपळनेर डेपोत जमा केला आहे.

loading image
go to top