गावठी कट्ट्यासह चौघांना अटक,  दोन चारचाकी कारसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त 

residentional photo
residentional photo

नाशिक : संगमनेर (जि. नगर) येथील दोघे गावठी कट्टा शहरातील दोघा सराईतांना विक्रीसाठी आले असता, दबा धरून बसलेल्या उपनगर पोलिसांनी दोन कारसह चौघांना अटक केली आहे. संशयितांकडून गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे व दोन कार असा सुमारे 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
      सुदर्शन प्रदीप शिंदे (33, रा. 12-समर्थ अपार्टमेंट, काठे गल्ली, नाशिक), सदाशिव पाराजी गायकवाड (28, रा. 41-म्हाडा बिल्डिंग, वडाळागाव, नाशिक), अमजद दाऊद सय्यद (35, रा. सय्यद बाबा चौकाजवळ, संगमनेर, जि. नगर), इम्रान आयूबखान पठाण (रा. मोगलपुरा, देवी गल्ली, संगमनेर, जि. नगर) अशी चारही संशयितांची नावे आहेत. तर, संशयित सुदर्शन शिंदे व सदाशिव गायकवाड हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नाशिकमधील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. 

    बुधवारी (ता.17) रात्री दहा वाजेच्या सुमारास पुणा रोडवरील उपनगर बसथांबा येथे संशयित सुदर्शन शिंदे, सदाशिव गायकवाड, अमजद सय्यद व इम्रान पठाण हे बोलेनो कार (एमएच 15 जील 4397), व स्विप्ट डिझायर कारमधून (एमएच 12 एचएफ 4297) आले होते. संशयितांविषयी पोलिसांना खबर असल्याने पोलिसांनी सापळा रचलेला होता. संशयित अमजद व इम्रान हे गावठी कट्टा व जिवंत काडतुसे संशयित सुदर्शन व सदाशिव यांना विक्री करण्यासाठी उपनगर बसथांबा येथे आले असता, दबा धरून बसलेल्या पोलिसांनी चौघांना अटक केली. 

   संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून 30 हजार रुपयांचा गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे असलेली मॅगझिन, 10 लाख रुपये किमतीची बलेनो कार, 9लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर, 56 हजार 450 रुपयांची रोकड असा 19 लाख 86 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल चौघांकडून जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई राहुल खांडबहाले यांच्या फिर्यादीनुसार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com