विना अडथळा नाशिक विकासास कायमच प्राधान्य-  भुजबळ यांची ग्वाही

live
live

नाशिक-विरोधाला विरोध करणारा मी माणूस नाही. विकासाच्या बाजूने मी नेहमीच उभा रहिलो आहे. त्यातही माझ्या नाशिकचा विषय असेल तर मी अधिकच प्राकर्षाने हा विषय मांडतो, लावून धरतो. गेल्या सरकारने नाशिकसाठी आखलेले चांगले प्रकल्प असतील तर त्यांना विरोध करणार नाही. अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ यांनी देत नागपूरची मेट्रो जाम झाली,मुंबईची फसली मग नाशिकच्या मेट्रोसारखा प्रकल्पाला प्रतिसाद न मिळणारा आणि तापदायक ठरणार असेल तर त्यासाठी अभ्यास करून निर्णय घेऊ,असेही सांगायला ते विसरले नाही. 

त्र्यंबक रस्त्यावरील जिल्हा परिषदेच्या नुतन प्रशासकीय कार्यालयाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण आज श्री.भुजबळ यांच्याहस्ते झाले. खा.संजय राऊत अध्यक्षस्थानी होते. माजी ग्रामविकासमंत्री आ.दादा भुसे,खासदार हेमंत गोडसे,डॉ.भारती पवार,आमदार हिरामण खोसकर,नरहरी झिरवाळ,दिलीप बनकर, नितीन पवार,सुहास कांदे,नरेंद्र दराडे,किशोर दराडे, माजी. खा.समीर भुजबळ,निर्मला गावीत,संपर्क प्रमुख भाऊ चौधरी,विभागीय आयुक्त राजाराम माने,जिल्हाधिकारी सुरज मांडरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे,तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गीते, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्‍वरी यांच्यासह सर्व सभापती,सदस्य उपस्थित होते.

मंत्री पॉवर गावपातळीवर आणले

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आचार्य अत्रेच्या चिकाटीचे उदाहरण देत श्री.भुजबळ म्हणाले, अत्रेनंतर खा.राऊत हे मी दुसरे पत्रकार पाहिले कि "शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार' असे पहिल्यापासून सांगत ते खरं करून दाखवलं. त्यांच्यामुळेच विरोध होत असतांनाही सारे एकत्र आले हे विसरता येणार नाही. मंत्री पॉवर हे गावपातळीपर्यत पोहचावे,यासाठी स्व.यशवंतराव चव्हाण यांनी जिल्हा परिषद,पंचाय समितीची निर्मिती केली. सुधाकरराव नाईकांच्या कालावधीत या अधिकारांचे वर्गीकरण झाले. 

लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांनी एकत्र काम करावे 
श्री.भुजबळ म्हणाले,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना दोनलाखांपर्यत कर्ज माफ करण्याचे ठरवले. नाशिकमध्ये3 लाखापेक्षा जास्त खातेदारांना फायदा होईल. गेल्यावर्षी 600 कोटी आले त्यातील दोनशे कोटी वाटले आणि चारशे कुठे गेले माहीत नाही. पण तसे आता होता कामा नये, पैसे शेतकऱ्यांच्या खात्यातच जमा व्हावे,त्याला फाटा फुटता कामा नये,असे त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. चांगल्या योजना आखून लोकांना प्रोत्साहन दिले जाईल,लोकरक्षण केले जाईल,असेही ते म्हणाले. यानिमित्ताने जिपला भव्य प्रशासकीय चांगली इमारत मिळणार आहे. सरकारी योजना चांगल्या असतात. पण लोकप्रतिनिधीं आणि अधिकाऱ्यांत समन्वयचा अभाव असतो. त्यामुळे त्या फसतात. लोकप्रतिनींनी अधिकाऱ्यांकडे कामे घेऊन जावी आणि अधिकाऱ्यांनी नकारघंटा न वाजवता ती करण्यास प्राधान्य द्यावे. त्यातूनच चांगले काम उभे राहते असेही त्यांनी नमूद केले. 

आम्ही विरोधकच,"महाराष्ट्र सदन' अद्वितीयच 
सरकार एकीकडे आणि आम्ही(पत्रकार) दुसरीकडे असतो. चूकले की ठोकण्याचे,विरोध करण्याचे काम आम्हाला जास्त आवडते,असे राऊत यांनी सध्याच्या विरोधी पक्षनेत्यांना समजत नाही,असा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणला. ही इमारत उत्तम शासकीय इमारत होईल,यात भुजबळ यांचे मार्गदर्शन जरूर घ्यावे. त्यांच्या मार्गदर्शनातून राजधानी दिल्लीत उभे राहिलेले "महाराष्ट्र सदन' हे अद्वितीय कामाचा नमूना आहे. इंडिया गेट अगोदर हे सदन प्रत्येकाने जरूर पहावे. यावर जेव्हा टिका झाली तेव्हाही मी या कामाचे कौतुकच केले होते. अशी ही वास्तू कायमच स्मरणात राहील असे सांगत भुजबळांवर स्तुतीसुमने उधळली. 6 महिन्यात सरकार जाईल वगैरे वगैरे या नुसत्या गप्पा आहे. सरकाराला काही भिती नसून पुढचे 5 काय 25 वर्षे महाआघाडीचे सरकार राहिले,यात तिळमात्र शंका नाही. एवढेच नव्हे तर देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य करण्यासाठी आपली साथ हवी असल्याचे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षा शितल सांगळे यांनी प्रास्ताविकातून या प्रशासकीय इमारतीचे वैशिष्ठ सांगत भविष्यात निधी कमी पडू न देऊ नये,

ठाकरेंच्या हस्ते व्हावे उद्घाटन

   महाआघाडीच्या काळात इमारत पूर्ण होऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्याची इच्छ व्यक्त केली तसेच सासरे पुंजाभाऊ व पती उदय सांगळे यांच्या शिकवणीद्वारेच वाटचाल सुरु असल्याचे नमूद केले. उपाध्यक्षा व सभापती नयना गावीत,सभापती यतींद्र पाटील,सुनिता चारोस्कर,अर्पणा खोसकर,गटनेते डॉ.आत्माराम कुंभार्डे,बाळासाहेब क्षिरसागर,उदयजाधव,यशवंत गवळी, आदी उपस्थित होते. एस.भुवनेश्‍वरी यांनी स्वागत केले. अर्थ व बांधकाम सभापती मनिषा पवार यांनी इमारती मागील संकल्पना सांगितली. भुषण मटकरी यांनी सुत्रसंचालन केले. 

निधी मार्गी लावावा

आ.भुसे म्हणाले, ग्रामविकासमंत्री असतांना पशुसंवर्धनची ही जागा जिपकडे वर्ग करण्याचा विषय मार्गी लावण्याबरोबरच 55 कोटीचा हा प्रकल्प 45 कोटींवर आणला. बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत योजनेतून दोन हजार कार्यालयाना सोयी दिल्या. आता भुजबळ ग्रामविकासमंत्री असल्याने त्यांनी इमारतीला उर्वरीत निधी उपलब्ध करून द्यावा असे सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com