पाळे ब्रद्रुकचा बटाटा भारीच...आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड,पाच हजार हेक्टरवर लागवड

residentional photo
residentional photo


कळवण : एखाद्या गावाचे वैशिष्ट्य त्या गावाची खासियत असते. पाळे बुद्रुक (ता. कळवण) गाव 50 ते 60 वर्षांपासून बटाटा लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. या वर्षी पाळे बुद्रुक गावात 300 ते 500 हेक्‍टर लागवड करून आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन विक्रमी उत्पादन घेण्याच्या तयारीत आहे. 
बटाटा थंड हवामानातील पीक असून, कळवण तालुक्‍यात पडत असलेले पर्जन्यमान व थंडीचे प्रमाण चांगले असल्याने बटाटा पिकाला पोषक वातावरण आहे. पाळे गावात बटाटा पिकाची लागवड केली जाते. सुरवातीला येथील शेतकरी थेट हिमाचल प्रदेशातून (सिमला) येथून बियाणे आणत असे. सध्या मंचर (पुणे ) येथे बटाटा बियाण्यांचे मोठे होलसेल विक्रेते असल्याने येथून शेतकऱ्यांनी बियाणे आणले. त्यात पुखराज, सिमला, ज्योती, कुफरी बियाण्यांचे वाण असले तरी शेतकऱ्यांनी पोखराज-2 या वाणाला पसंती दिल्याचे लागवडीवरून दिसून आले. 

कळवण बटाटा आघाडीवर

जिल्ह्यात नाशिक व मालेगाव बाजारपेठेत इतर ठिकाणच्या बटाट्यापेक्षा कळवण येथील बटाट्याला जास्त मागणी असते. त्यात वेफर्स, बटाटा कीस व उपवासाचे वाळवण पदार्थ तयार करण्यासाठी बटाट्याला मोठी मागणी असते. पाळे गावात महिला व वेफर्स बनविणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधीही थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरेदी करीत असल्याने पाळे येथील बटाट्याला चांगले मार्केट मिळते. 

कळवण तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मंचर येथील बाजारपेठेतून जवळपास हजार ते दोन हजार क्विंटल बियाणे खरेदी केले आहे. यापूर्वी शेतकरी सिमला व इतर ठिकाणाहून बियाणे मागवीत होते. 
-सागर थोरात, संचालक, सागर ट्रेडिंग कंपनी, मंचर 

दोन-तीन पिढ्यांपासून पाळे बुद्रुक गावात बटाटा लागवड केली जाते. आम्ही स्वतः दर वर्षी दोन हेक्‍टरमध्ये लागवड केली आहे. या पिकाच्या लागवडीसाठी अंदाजे एकरी 40 ते 50 हजार रुपये खर्च येणार आहे. 
-सतीश देशमुख, शेतकरी, पाळे बुद्रुक 

तालुक्‍यात कांदा, बटाटा व भाजीपाला पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्या पिकांसाठी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून दोन वर्षांत 510 शेतकऱ्यांना एक कोटी 77 लाख 88 हजार 590 रुपयांचे अनुदान दिले असून, 389 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. त्याचा बटाटा पिकालाही फायदा झाला आहे. 
-विजय पाटील, तालुका कृषी अधिकारी 

एकरी खर्च... 
बियाणे 8 क्विंटल ः सध्याचा भाव 2000 ते 2100 
लागवड मजुरी ः 3000 
कृत्रिम खते ः 5000 ते 6000 
पाच ट्रॉली शेणखत सध्याचे दर ः 5000 ते 25000 
औषध फवारणी व निंदणी ः 3000 ते 4000 
काढणी खर्च ः 3000 ते 4000 
एकरी उत्पादन ः 150 ते 200 क्विंटल 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com