बिबट्याच्या दर्शनामुळे गिरणा काठावरच्या गावातील शेतकरी दहशतीखाली

संजीव निकम
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

खबरदारीच्या उपाय योजना म्हणून जनावरे बांधलेल्या गोठ्यात लाईट चालू ठेवावे, फटाके फोडावेत, एकटे दुकटे घराबाहेर पडू नये अशी सतर्कता बाळगण्याच्या सूचना त्यांनी दोघाही गावातील शेतकऱ्यांना केल्यात वनविभागाने मागविलेल्या पिंजरा उद्या दाखल होईल अशी माहिती गावकऱ्यांना वन कर्मचाऱ्यांनी दिली.

नांदगाव : बिबट्याच्या दर्शनामुळे आमोदे बोराळे या गिरणा काठावरच्या गावातील शेतकरी दहशतीखाली वावरत आहेत गेल्या आठवड्यात चाळीसगाव नांदगाव तालुक्याच्या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातल्याने त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गिरणा काठावरच्या आमोदे बोराळे गावातील नागरिकांनी केली आहे तालुक्यात बिबट्या आढळून येण्याच्या घटना वाढत असून दोनच महिने आधी पोखरी शिवारात आठ महिन्यांचा बिबट्या सापडल्याच्या घटनेनंतर आमोदे बोराळे परिसरात बिबट्या दिसल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आली आहे 

दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज सायंकाळी बिबट्या दिसलेला परिसर पिंजून काढला उद्या नाशिक येथून पिंजरा मागविण्यात आला आहे बोराळे येथून बुधवारी कापसाची गाडी घेऊन सायगावला जात असलेल्या मोहसीन नावाच्या चालकाला आमोदे येथील बोराळेच्या शिवबंधावरील कापसाच्या शेतात उभा असलेल्या बिबट्या दिसला अंधारात चकाकणारे डोळे व गाडीच्या प्रकाशात तो दिसल्याने त्याने ही बाब गावकऱयांना कळविली शिवसेनेचे विभागप्रमुख असलेल्या अप्पासाहेब पगार यांनी लगेचच ही बाबा वनखात्याला कळविली हा प्रकार कालच घडलं असताना आज पुन्हा सायंकाळी साडे पाचच्या सुमाराला शेतात कापसावर फवारणी करीत असलेल्या जितेंद्र सोळुंके यांना बिबट्या दिसताच त्यांनी धूम ठोकली व गावात येऊन ही माहिती कळविली उपसरपंच राजेंद्र पवार यांनी वनखात्याला ही बाब कळविली बिबट्याच्या आगमनाची माहिती ककळल्यावरून वनखात्याचे कर्मचारी घटनास्थळी आले व रात्री उशिरापर्यंत त्यांनी हा परिसर पिंजून काढला. खबरदारीच्या उपाय योजना म्हणून जनावरे बांधलेल्या गोठ्यात लाईट चालू ठेवावे, फटाके फोडावेत, एकटे दुकटे घराबाहेर पडू नये अशी सतर्कता बाळगण्याच्या सूचना त्यांनी दोघाही गावातील शेतकऱ्यांना केल्यात वनविभागाने मागविलेल्या पिंजरा उद्या दाखल होईल अशी माहिती गावकऱ्यांना वन कर्मचाऱ्यांनी दिली.

दरम्यान, गेल्या आठवड्यात या गावालगत असलेल्या चाळीसगाव तालुक्यातील सायगाव, काकळणे, नांद्रे भागात आलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात दोन महिला व एक लहान मुलगी जखमी झाले होते. त्यांच्यावर धुळ्यात उपचार सुरु आहेत गेल्या आठवड्यापासून या बिबट्याचा वावर या परिसरात असून ही सर्व गवे गिरणा काठावरची असून सदरचा बिबट्या पाटणादेवी भागातून आला असण्याची शक्यता आहे त्याला पकडण्यासाठी चाळीसगाव वनविभागाने नांद्रे भागात पिंजरा लावला होता. मात्र तो अडकला नाही आता त्याचा वावर नांदगाव-चाळीसगावच्या सीमेवरच्या शिवारात दिसू लागल्याने नांदगाव तालुक्यातील वनखात्याला त्याची दखल घ्यावी लागत आहे.

Web Title: marathi news nashik nandgaon leopard wildlife farmers