झोक्‍याचा फास बसून चुंचाळेत मुलीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

नाशिक - राहत्या घरामध्ये मुलींसोबत झोका खेळत असताना तो तुटला आणि त्यातच गळ्याला फास बसून दहावर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अंबडच्या जाधव संकुल परिसरात रविवारी (ता. 11) दुपारी ही घटना घडली. तितिक्षा किरण राऊळ (वय 10, रा. जाधव संकुल रो-हाउस, चुंचाळे शिवार) असे मृत मुलीचे नाव आहे. दोन आठवड्यांपूर्वीच हरसूल (ता. त्र्यंबकेश्‍वर) परिसरातील आदिवासी पाड्यावरही 12 वर्षांच्या मुलाचा झोका खेळत असताना गळफास बसून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा तशीच घटना नाशिकला घडली.
Web Title: marathi news nashik news girl death by hanging