17 वर्षीय मुलाने घेतली जैनधर्माची दीक्षा

दिगंबर पाटोळे
शनिवार, 13 जानेवारी 2018

वणी : येथील प्रसिध्द व्यापारी अल्केश समदडिया यांचा सतरा वर्षीय मुलगा तनिष्क कुमार समदडिया हा २२ जानेवारी रोजी पालीताना (गुजरात) येथे जैनधर्माची दीक्षा घेत असून दीक्षार्थी तनिष्ककुमारची हजारो जैनबांधवांच्या उपस्थित भव्य मिरवणूक (वरघोडा) संपन्न झाली. 

येथील उच्चशिक्षित अमृता कुमारपाल बोरा यांचा मागील महिन्यात ४ डिसेंबर रोजी पालीताना दीक्षाविधी संपन्न झाल्यानंतर वणीतील अवघा १७ वर्षीय तनिष्ककुमार समदडिया कुटुंबव्यवस्थेचा त्याग करीत जैनधर्माच्या प्रचार प्रसारासाठी जैनधर्माची दीक्षा घेत आहे. 

तनिष्क आल्केश समदडिया हा वयाच्या ९ वर्षापासून जैन साधु- संताच्या सहवासात असून दोन तीन वर्षापासून गच्छाधिपती पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांच्या संपर्कात होता. जैन धर्मियांची शिकवण व जैन संताच्या विचाराचा प्रभाव बालवयापासून पडत गेल्याने तनिष्ककुमारने अंतिमत: जैनदीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. २२ जानेवारी रोजी जैन धर्मियांचे प्रमुख तीर्थस्थान असलेल्या पालीताना (गुजरात) येथे तनिष्ककुमारचा दीक्षा विधी संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने सकाळी साडेआठ वाजता तनिष्कच्या निवासस्थानी कुंकमचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर तनिष्कने गावातील जैन श्र्वेतांबर मंदिरात जावून विधीवत पुजन केल्यानंतर समदडिया कुटुंबीय, समस्त वणीकर व जैनबांधवाच्यावतीने तनिष्ककुमारची जैन संत व साध्वींच्या उपस्थित भव्य वरघोडा मिरवणूक काढण्यात आली. 

मिरवणूकीत उंट, हत्ती, नृत्य करणारे घोडे, देवतांच्या वेशभुषेतील आदिवासी नृत्य पथक, ढोल ताशाचे पथक नेत्रदिपक ठरले. परमपूज्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांचे शिष्य मुक्तीभुषण विजय महाराज व मैत्रीभुषन विजय महाराज यांच्यासह साध्वी यांच्यासह मिरवणूकीत आकर्षक रथावर स्वार झालेल्या तनिष्क व आई वडीलांचे गावातील विविध संस्था, संघटना यांच्यावतीने ठिकठिकाणी स्वागत व सत्कार करण्यात आला. कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, माजी आमदार रामदास चारोस्कर, दिलीपकाका बनकर, राजेंद्र डोखळे, वणी ग्रामपंचायतीचे उपसरपंच विलास कड, माजी सरपंच मधुकर भरसट, राजेंद्र गोतरणे आदींसह जिल्हाभरातील जैनबांधव, वणी ग्रामस्थ सहभागी झाले होते. मिरवणूकीची सांगता शंखेश्वर पार्श्वनाथ तीर्थक्षेत्रावर होवून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दरम्यान आज पाप स्थानक पुजन, मातृ-पितृ वंदन संपन्न होणार आहे, तर ता.१४ रोजी महिला सत्संग सोहळा होऊन ता. १५ रोजी अंतीम वायना होऊन तनिष्क गृहत्याग करणार आहे. 

Web Title: Marathi news nashik news jain religion 17 years old boy takes diksha